‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. मालिका, रिऍलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेला अक्षय कधी प्रेक्षकांचा लाडका झाला कळलंच नाही. आता लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे आणि ही आनंदाची बातमी त्याने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गतवर्षी अक्षय केळकरने त्याची गर्लफ्रेंड ‘रमा’ची सगळ्यांना ओळख करून दिली. यानंतर तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने सांगितलं. अखेर आता त्याच्या लग्नाचा मुहूर्तदेखील ठरलाय. (Akshay Kelkar going to tie marriage knot on this day)
अक्षय केळकर अडकणार लग्नबंधनात
अभिनेता अक्षय केळकर आणि त्याची गर्लफ्रेंड रमाच्या नात्याला गेल्या 23 डिसेंबरला 10 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त त्याने आपली गर्लफ्रेंड कोण याचा खुलासा करताना एक सुंदर व्हिडीओ शेअर केला होता. यासोबत आपण लवकरच लग्न करणार असल्याचेही त्याने सांगितले होते. यानंतर आता अक्षय- रमाच्या लग्नाचा मुहूर्त ठरल्याचे समजत आहे. सध्या अक्षय रमासोबत फिरतानाचे व्लॉग शेअर करताना दिसतो. दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्याने आपल्या लग्नाचा महिना सांगितला आहे.
अक्षय केळकरची पोस्ट
अक्षय केळकरने ही पोस्ट त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यात त्याने गर्लफ्रेंड रमासोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘मे 2025 मुहूर्त ठरला आहे. आता ना फिरणे माघारी, वाजवा हो तुतारी, करा ही तयारी… तरीही मुलींनो, आय लव्ह यू… मी फक्त तुमचाच आहे’. अक्षयची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि पोस्टवर कमेंटच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अक्षय- रमाची लव्हस्टोरी
अक्षय केळकरच्या होणाऱ्या पत्नीला सगळे ‘रमा’ या नावाने ओळखतात. पण तिचे मूळ नाव साधना काकतकर असे आहे. ती एक सुंदर गायिका आहे. तसेच गीतकारदेखील आहे. अक्षय केळकर आणि समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’ आणि ‘मैतरा’ या गाण्यांसाठी साधनाने काम केले आहे. साधनाच्या आवाजावर भाळलेला अक्षय तिच्या प्रेमात पडला आणि आता लवकरच ते एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. साधना एकांकिकेत गात असताना अक्षयने तिला पाहिलं आणि तिचा आवाज ऐकून हीच माझी प्रेयसी, हीच माझी बायको असं त्याने ठरवलं. अक्षयने दोनवेळा प्रपोज केल्यानंतर साधनाने नकार दिला. पण नंतर साधनाने त्याला प्रपोज केलं आणि सुरू झाली त्यांची लव्हस्टोरी.
हेही पहा –
Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकर प्रस्तुत स्थळ चित्रपटाचा ट्रेलर लाँच