घरमनोरंजनअक्षय कुमार आणि दलजीत सिंगने सोसल्या प्रसुती कळा

अक्षय कुमार आणि दलजीत सिंगने सोसल्या प्रसुती कळा

Subscribe

असं म्हणतात की मुलाला जन्म दिला की आईचा दुसरा जन्म होतो. कारण त्या आईला मुलाला जन्म देताना प्रसुती कळा सोसाव्या लागतात. पण याचा अंदाज पुरूषांना येत नाही. बाळाला जन्म देण्यासाठी स्त्रीला कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते याची कल्पनाही पुरूष करू शकत नाहीत. पण याच प्रसुती कळा समजून घेण्याचा प्रयत्न बॉलिवूडच्या दोन कलाकारांनी केला आहे. ‘गुड न्यूज’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि दिलजित दोसांज यांनी बाळाला जन्म देताना एका आईला होणाऱ्या वेदना प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत. हा व्हिडिओ अक्षय कुमारने सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

अक्षय आणि दलजितने ‘इलेक्ट्रीक स्टीम्युलेशन’ या तंत्रज्ञानाव्दारे गर्भापणातील कळांचा अनुभव घेतला. इतकेच नाही तर या कळांमुळे होणाऱ्या त्रासानंतर त्यांनी जगातील तमाम मातावर्गाचे आभारही मानले आहेत. ‘इलेक्स्ट्रीक स्टीम्युलेशन’द्वारे त्यांनी प्रसुतीकळांचा अनुभव घेतला. त्यामुळे केवळ कलाकार म्हणून चित्रपटातील आपली भूमिका पार पाडण्यापुरते नाही तर पुरुषांना स्त्रियांच्या त्रासाची जाणिव व्हावी या सामाजिक हेतूने या दोघांनीही एका व्हिडियोच्या माध्यमातून प्रत्येक मातेला होणारा त्रास सर्वांसमोर मांडला आहे.

- Advertisement -

या प्रयोगानंतर मात्र या दोघांनी स्त्री किती त्रास सहन करते याचा अनुभव घेतल्याचे सांगितले आणि त्यांनी सगळ्या मातांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -