Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि रवीना टंडन दिसले एकत्र

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि रवीना टंडन दिसले एकत्र

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता अक्षय कुमार हे दोघेही एकेकाळी त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत होते. दोघांनीही 90 च्या दशकात अनेक चित्रपटात एकत्र काम केले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टीकू शकले नाही. त्यानंतर दोघांनीही कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केले नाही. दरम्यान, अशातच आता इतक्या वर्षांनंतर एका कार्यक्रमातून दोघांचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओ आणि फोटोमध्ये दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत होते. अक्षय कुमार आणि रवीना टंडनचे हे व्हिडिओ-फोटो पाहिल्यानंतर चाहते खूप आनंदी दिसत आहेत.

या कार्यक्रमात अक्षय-रवीना एकत्र दिसले

अक्षय कुमार आणि रवीना टंडन ही जोडी एकेकाळी खूप चर्चेत आली होती. पण त्यांच्या ब्रेकअपनंतर परिस्थिती ते कायमचे दूर झाले. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते अनेक वर्षांपासून उत्सुक होते. अशातच इतक्या वर्षानंतर दोघेही एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसले. या कार्यक्रमातील अक्षय कुमार आणि रवीना टंडनचे अनेक व्हिडिओ-फोटो समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये अक्षय आणि रवीना एकमेकांना मिठी मारताना दिसत होते. अक्षय कुमार आणि रवीना टंडनचे व्हिडीओ-फोटो त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर जोरदार शेअर केले जात आहेत.

अक्षय आणि रवीनाने ‘या’ चित्रपटात केले होते एकत्र काम

- Advertisement -

अक्षय कुमार आणि रवीना टंडनची जोडी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसली आहे. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी ‘मोहरा’, ‘खिलाडीयों का खिलाडी’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार आणि रवीना टंडनची एंगेजमेंट झाली होती. मात्र, नंतर दोघांनी एकमेकांशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या तीन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

- Advertisment -