यूरोपमध्ये होणार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मिया छोटे मिया’ चे शूटिंग

नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार 'बडे मिया छोटे मिया' चित्रपटाचे शूटिंग यूरोपमध्ये सुरू केले जाणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू केली आहे

बॉलिवूडचे दोन ॲक्शन स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट ‘बडे मिया छोटे मिया’ची जेव्हापासून अनाउंसमेंट करण्यात आली आहे. तेव्हा पासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका बातमीनुसार अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि टायगरचा ‘हीरोपंती 2’ फ्लॉप झाल्यामुळे ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपट करायचा की नाही यावर या चित्रपटाचे निर्मिते पुन्हा विचार करत होते मात्र आता नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटाचे शूटिंग यूरोपमध्ये सुरू केले जाणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू केली आहे.

‘बडे मिया छोटे मिया’मध्ये असणार मोठे ॲक्शन सीन
सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचे निर्मीते चित्रीकरणासाठी यूरोप जाण्यापूर्वी यावेळी ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटाच्या स्क्रिप्टची पुन्हा तपासणी करत आहेत. या चित्रपटात खूप मोठ-मोठे ॲक्शन सीन दाखण्यात येणार असून ॲक्शन सीनला डिझाइन करण्यासाठी चित्रपटाची टीम सहभागी झाली आहे. अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत निर्माते ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटासाठी दोन मुख्य अभिनेत्रींना देखील फाइनल करतील.

‘बडे मिया छोटे मिया’ २०२३ मध्ये होणार रिलीज
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटाला वाशु भागवानी आणि पूजा एंटरटेनमेंट प्रोड्यूस करत आहेत. अली अब्बास जफर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट लिहिला आहे. ‘बडे मिया छोटे मिया’ हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पहिले टीजर आउट झाले असून २०२३ मध्ये हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


हेही वाचा :नयनतारा आणि विग्नेश शिवन अखेर विवाहबंधनात