घरताज्या घडामोडीअक्षय कुमारच्या चित्रपटातील गाण्याच्या पोस्टरवर चोरीचा आरोप!

अक्षय कुमारच्या चित्रपटातील गाण्याच्या पोस्टरवर चोरीचा आरोप!

Subscribe

आपणं पाहिलं आहे की, बऱ्याच चित्रपटावर वेगवेगळ्या प्रकारे कॉपी केल्याचे आरोप लावले जातात. कधी चित्रपटाच्या कहाणीवर कॉपीचा आरोप लावला जातो, तर कधी म्युझिक किंवा पोस्टवर लावला जातो. अशाच प्रकारे यावेळेस अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) स्टार कास्ट असलेल्या ‘बेल बॉटम’ (Bella Bottom) या चित्रपटातील गाणं ‘मरजावां’ (Marjaawaan) वर आयडिएशन चोरीचा आरोप लावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय आहे?

बॉलिवूडचा खिलाडी कुमारचा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच आज चित्रपटातील ‘मरजावां’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. गाणं प्रदर्शित होण्यापूर्वी गाण्याचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. हा पोस्टर खूपच व्हायरल होत आहे. काही सोशल मीडिया युजर्सने एका ट्रॅव्हल इंफ्लूएंसरचा फोटो कॉपी केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सध्या ‘मरजावां’ गाण्यावर कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच काही सोशल मीडिया युजर्स पोस्टर ट्रोल करत आहे आणि याला गंदी कॉपी असं म्हणत आहेत.

‘मरजावां’ गाण्यातील पोस्टरमधील फोटोप्रमाणे अनेक फोटो आहेत. दरम्यान अक्षय कुमारचे चाहते त्याची बाजू घेत आहेत. ही एक कॉमन पोज असल्याचे सांगत असून अशात हे कॉपी केल्याचे म्हणणे चुकीचे आहे, असे अक्षयचे चाहते म्हणत आहे. ‘मरजावां’ आणि इतर पोस्टरमध्ये खूप फरक आहे, असे म्हणत चाहते अक्षयच्या पाठिंमागेच उभे राहिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Diet Sabya (@dietsabya)

- Advertisement -


हेही वाचा – BellBottom: ‘मरजावां’ या पहिल्या गाण्यात अक्षय कुमारसह वाणी कपूर दिसले Romantic अंदाजात


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -