घरमनोरंजनऑनस्क्रीन 'रुस्तम' करणार युनिफॉर्मचा लिलाव, निधी प्राण्यांसाठी

ऑनस्क्रीन ‘रुस्तम’ करणार युनिफॉर्मचा लिलाव, निधी प्राण्यांसाठी

Subscribe

अभिनेता अक्षय कुमार नेगमीच देशभक्तीपर भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भारतीय लष्कराचे मनोबल वाढवणारा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देणारा खिलाडी कुमार आता प्राण्यांच्या हितासाठी पुढे सरसावला आहे. अक्षय कुमार त्याच्या ‘रुस्तम’ चित्रपटातील गणवेशाचा लिलाव करणार असून त्यातून मिळणारा निधी प्राण्यांच्या देखभालीसाठी वापरणार आहे. यासंबंधीची माहिती स्वतः अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

अक्षयचा रुस्तम चित्रपटातील नेवी युनिफॉर्मचा लवकरच लिलाव होणार आहे. या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी अक्षयने सर्वांना आवाहन केले आहे. अक्षय कुमार ट्विटरमध्ये म्हणाला की, ‘मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की, मी माझ्या रुस्तम चित्रपटातील युनिफॉर्मचा लिलाव होत आहे. या लिलावातून मिळणारा निधी प्राण्यांच्या देखभालीच्या कामासाठी वापरला जाईल.’

- Advertisement -

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -