घरताज्या घडामोडी'बॉलिवूड खान'ना मागे टाकत खिलाडी अभिनेत्याची ७०० कोटींची कमाई

‘बॉलिवूड खान’ना मागे टाकत खिलाडी अभिनेत्याची ७०० कोटींची कमाई

Subscribe

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींची कमाई केली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने बॉक्स ऑफिसवर एक अनोखा असा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमारने आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान या तिन्ही अभिनेत्यांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींची कमाई करणाला अभिनेता ठरला आहे.

- Advertisement -

या चित्रपटांनी केली कोटींची कमाई

बॉलिवूड हंगामाच्या वेबसाइटनुसार अक्षय कुमारचे २०१९ मध्ये केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल्ल ४ आणि गुड न्यूज, असे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चारही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तब्बल ७१९ कोटींची कमाई केली आहे. तसेच सध्या गुड न्यूज हा चित्रपट सिनेमागृहात अजूनही कमाई करत आहे. त्यामुळे येत्या काळात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तर रणवीर सिंग दुसऱ्या क्रमांकावर

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर आहे, तर रणवीर सिंग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रणवीर सिंगने २०१८ साली केलेल्या पद्मावत आणि सिम्बा या चित्रपटांवर तब्बल ५४२ कोटींची कमाई केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर सलमान खान असून २०१५ साली सलमानने बजरंग भाईजान आणि प्रेम रतन धन रतन पायो या चित्रपटांवर ५३० कोटींची कमाई केली असून चौथ्या स्थानावर प्रभासने आपले स्थान मिळवले आहे. प्रभासच्या बाहुबली – द कन्क्लूजन या चित्रपटाने २०१७ मध्ये ५१० कोटीचा बॉक्स ऑफिसवर गला केला आहे. तर २०१९ मध्ये वॉर और सुपर ३० या चित्रपटाने हृतिकला पाचवे स्थान मिळवून दिले आहे. या चित्रपटाने ४६४ कोटींची कमाई करुन दिली आहे. तर रितेश देशमुख सहाव्या क्रमांकावर असून त्यांच्या हाऊसफुल्ल ४, मर जावां आणि टोटल धमाल या तीन चित्रपटांनी त्याला ३९६ कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई करुन दिली आहे.

- Advertisement -

हे आहेत कोटींची कमाई करणारे स्टार

  • अक्षय कुमार – २०१९ – ७१९ कोटींची कमाई
  • रणवीर सिंग – २०१८ – ५४२ कोटींची कमाई
  • सलमान खान – २०१५ – ५३० कोटींची कमाई
  • प्रभास         – २०१७ – ५१० कोटींची कमाई
  • हृतिक        – २०१९ – ४६४ कोटींची कमाई

हेही वाचा – ‘नाना पाटेकर दुसरा आसाराम बापू’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -