अक्षय कुमारचे हिंदीसिनेसृष्टीत ३० वर्ष पूर्ण, ‘पृथ्वीराज’ चित्रपटानिमित्त अनोख पोस्टर सादर

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचे हिंदी चित्रपट सृष्टीतले ३० वर्ष पूर्ण झाले आहेत आणि याचं निमित्ताने त्याचा आगमी चित्रपट ‘पृथ्वीराज’चे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यश राज फिल्म्सद्वारा पृथ्वीराज या चित्रपटाच्या एका नवीन पोस्टरला उत्तम पद्धतीने सादर करण्यात आले आहे.

या पोस्टरची खास गोष्ट अशी की, या पोस्टरच्या फोटोमध्ये अक्षय कुमारच्या प्रत्येक चित्रपट दाखवण्यात आलं आहे. प्रोडक्शन हाऊसद्वारे दाखवण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार म्हणतोय की, “हे माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही, की ही अॅक्टिविटी चित्रपटातील माझे ३० वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी होत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे की, माझ्या ‘सौगंध’ चित्रपटाला आता ३० वर्ष पूर्ण झाली आहेत.”

अक्षयने सांगितला त्याच्या पहिल्या चित्रपटातला किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार त्याच्या पहिला चित्रपट ‘सौगंध’बाबत एक खास किस्सा सांगत आहे. ज्यामध्ये त्या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाची आठवण सांगत आहे. तो म्हणतोय की, त्या चित्रपटाचा पहिला शॉट त्यांनी ऊटीमध्ये शूट केला होता, जो एक अॅक्शन सीन होता.

पृथ्वीराज चित्रपटात अक्षय साकाराणार सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका

चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटात निडर, पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आणि कतृत्वावर आधारित आहे. यामध्ये अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज चौहान यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. अक्षय बरोबर या चित्रपटात सहकलाकार म्हणून मानुषी छिल्लर संयोगिता ही भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट हिंदीसह, तमिळ आणि तेलगु भाषेमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी अडकले विवाहबंधनात