HomeमनोरंजनAkshay Kumar Covid Positive : अक्षय कुमारला कोरोनाची लागण

Akshay Kumar Covid Positive : अक्षय कुमारला कोरोनाची लागण

Subscribe

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. अशातच आता बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमार या विवाह सोहळयाला उपस्थित राहू शकणार नाही.

अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अक्षयने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. खरं तर, सरफिरा या चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान अक्षयला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. केवळ अक्षयच नाही तर टीममधील आणखी काही लोकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अक्षय आता सरफिरा चित्रपटाचे कोणतेही प्रमोशन करणार नाही. तसेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यात उपस्थित राहणार नाही. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी हा स्वतः अक्षय कुमारच्या घरी गेला होता आणि लग्नाची पत्रिका दिली होती. दरम्यान, अक्षय कुमारने कोरोना डिटेक्ट झाल्यावर एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःहून आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अक्षय आता औषधे उपचार घेत आहे.

दरम्यान, देश परदेशातून आलेल्या अनेक सिलेब्रिटींच्या उपस्थितीत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाहासाठी माइक टायसन, जॉन सीना, जस्टिन बिबर यासारखे परदेशी कलाकार अर्थात हॉलिवूड स्टार आले आहेत.

 

 

 


Edited By – Chaitali Shinde