घरमनोरंजनदसऱ्याच्या मुहूर्तावर अक्षय कुमारने केले FAU-G गेमचे टीझर लाँच

दसऱ्याच्या मुहूर्तावर अक्षय कुमारने केले FAU-G गेमचे टीझर लाँच

Subscribe

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने FAU-G चा टीझर दसऱ्याच्या मुहूर्तावर लाँच केला आहे. काल, रविवारी या गेमचा फर्स्ट लूक अक्षयने त्याच्या सोशल मीडिया साईटवर शेअर केला आहे. या टीझरच्या पहिल्याच सीनमध्ये गलवान खोऱ्यात उड्डाण करणारे हेलिकॉप्टर दिसत आहेत. हा गेम नोव्हेंबर महिन्यात लाँच होणार असून टीझर शेअर करताना अक्षय कुमारने पोस्ट देखील केली आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, असत्यावर सत्याचा विजय असा आजचा दिवज आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक असलेल्या फौजींसाठी जल्लोष साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असू शकतो? दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर फौजीचा टीझर सादर करत आहे.

- Advertisement -

अक्षय कुमारे दोन महिन्यांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटले होते की, पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स – फौजी. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा २० टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे. दरम्यान, हा गेम लोकप्रीय ठरलेल्या पब्जीला टक्कर देईल, असेही म्हटले जात आहे.

हेही वाचा –

‘तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही’; निलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -