अक्षय कुमार भडकला, युट्यूबरवर ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा!

Akshay Kumar bought new luxurious apartment in Mumbai
Akshay Kumar ले घेतलं मुंबईत आलिशान घर, किंमत ऐकून उडेल तुमची झोप

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने बिहारच्या युट्यूबर राशिद सिद्दीकीवर ५०० कोटींची मानहानीची केस केली आहे. राशिदने अक्षय कुमारचे नाव सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ओढले होते. राशिदने त्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमारवर गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला की, ‘अक्षय कुमारने रिया चक्रवर्तीला कॅनडामध्ये पळून जाण्यास मदत केली होती.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

एवढेच नाही तर राशिदने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, ‘अक्षयने सुशांत प्रकरणासंदर्भात मुंबई पोलीस आणि आदित्य ठाकरेंसोबत सीक्रेट मिटिंग्स आयोजित केली होती. तसेच याप्रकरणी अक्षय कुमारे एकही विधान केले नाही.’ राशिदच्या या व्हिडिओमुळेच अक्षय भडकला आणि त्याने राशिदवर ५०० कोटींची मानहानींची केस केली आहे.

१४ जून रोजी सुशांतसिंह राजपूत याने आपल्या वांद्रे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी अनेक व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सध्या अक्षय कुमार ‘लक्ष्मी’ चित्रपटामुळे जास्त चर्चेत आला आहे. चित्रपटात अक्षय कुमारने मुस्लिम मुलाची भूमिका साकारली आहे. यामध्ये अक्षयच्या अंगात लक्ष्मी नावाची ट्रांसजेंडर भूत येते असे दाखवले आहे. हा चित्रपट टायटल आणि पटकथामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्यानंतर चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे.


हेही वाचा – ‘जुग जुग जियो’मध्ये वरुण आणि कियाराची दमदार केमिस्ट्री