घरमनोरंजनRam Setu FIRST look: अक्षय कुमारचा 'राम सेतू' दिवाळीच्या मुहूर्तावर होणार...

Ram Setu FIRST look: अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ दिवाळीच्या मुहूर्तावर होणार रिलीज; पोस्टर शेअर करत दिली माहिती

Subscribe

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. राम सेतू च्या नव्या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसह जॅकलिन फर्नांडिस आणि सत्यदेव दिसत आहे. या फोटोवरून तरी अक्षय कुमार काहीतरी अद्भूत रहस्यमय घटनेचा शोध घेत असल्याचे दिसतेय. हेच रहस्य राम सेतू चित्रपटातून उलगडणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.या नव्या पोस्टरमध्ये तिघेही एका भव्य कलाकृतीसमोर उभे आहेत आणि कोणत्यातरी गोष्टीचा शोध घेत आहेत. यावेळी अक्षयच्या हातात मशाल दिसत आहे, तर जॅकलिनच्या हातात टॉर्च धरलेली दिसत आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा आणि सत्यदेव कंचरानाही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘राम सेतू’ चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की – ‘राम सेतूच्या जगाची झलक. दिवाळीला 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक पुरातत्व शास्त्रज्ञ बनला आहे, जो त्याच्या टीमसह रामराज्याशी संबंधित काही तथ्यांवर संशोधन करत असतो. या चित्रपटाचा काही भाग राम सेतू पुलावर चित्रीत झाला आहे. चित्रपटाचे शूटिंग बहुतांश उत्तर भारतात झाले आहे.

- Advertisement -

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मा यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी ‘परमानु’ आणि ‘तेरे बिन लादेन फेम’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. तर विक्रम मोटवानी चित्रपटाचे निर्माते आहेत.

लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. मात्र नेमक्या कोणत्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल हे अद्याप स्पष्ट नाही. अक्षयचा हा चित्रपट थिएटरसोबतच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर देखील प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्याच्या वर्क फ्रंटवर, अक्षय कुमार लवकरचं पृथ्वीराज, रक्षाबंधन, गोरखा, OMG 2, सेल्फी आणि मिशन सिंड्रेल यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -