HomeमनोरंजनAkshay Kumar : 'स्काय फोर्स'ची तिसऱ्या दिवशी करोडोंची कमाई, खिलाडीचा सिनेमा हिट...

Akshay Kumar : ‘स्काय फोर्स’ची तिसऱ्या दिवशी करोडोंची कमाई, खिलाडीचा सिनेमा हिट ठरणार?

Subscribe

बॉक्स ऑफिसवर ‘स्काय फोर्स’ हा सिनेमा चांगली कामगिरी करताना दिसतोय. 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर अगदी 3 दिवसात या सिनेमाने करोडो रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 40 करोडपेक्षा अधिक कमाईचा आकडा पार केला आहे. एकूणच पाहता हा सिनेमा येत्या दिवसांत आणखी चांगली कमाई करेल, असे चित्र दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने गेल्या काळात जितके सिनेमे केले ते एकामागे एक फ्लॉप होत गेले. यामुळे अभिनेत्यावर फ्लॉपचा शेरा लागला होता. अशातच अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालाय. ज्याने केवळ 3 दिवसांत करोडो रुपयांची कमाई केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अभिनेत्याला या सिनेमाकडून चांगली ग्रीप मिळेल, अशी अपेक्षा आहे. तूर्तास या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद ठीकठाक असला तरीही प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा चांगला फायदा झाला आहे. (Akshay Kumar film Sky Force day 3 BO Collection)

बॉक्स ऑफिसवर ‘स्काय फोर्स’ची उत्तम कामगिरी

बॉक्स ऑफिसवर ‘स्काय फोर्स’ हा सिनेमा चांगली कामगिरी करताना दिसतोय. 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर अगदी 3 दिवसात या सिनेमाने करोडो रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 40 करोडपेक्षा अधिक कमाईचा आकडा पार केला आहे. एकूणच पाहता हा सिनेमा येत्या दिवसांत आणखी चांगली कमाई करेल, असे चित्र दिसत आहे.

प्रजासत्ताक दिनाची सुट्टी फळली

शुक्रवारी (24जानेवारी) प्रदर्शित झालेल्या ‘स्काय फोर्स’ सिनेमाला प्रजासत्ताक दिनाच्या (26जानेवारी) निमित्ताने कमाईची एक चांगली संधी प्राप्त झाली. मैडॉक फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी 15.30 करोड रुपये आणि दुसऱ्या दिवशी 26.30 करोड रुपयांचे कलेक्शन केले. तर तिसऱ्या दिवशी 27.5 करोड रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे या सिनेमाने आता 60 करोड रुपयांचा गल्ला पार केला आहे. सिनेमाच्या कमाईची सुरुवात करोडो रुपयांनी झाल्यानंतर आता पुढे हा सिनेमा काय आणि कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘स्काय फोर्स’ या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर यांनी केले आहे. तर अमर कौशिक, ज्योती देशपांडे आणि दिनेश विजन हे निर्माते आहेत. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय वीर पहाडिया देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमातून वीर पहाडिया बॉलिवूड सिनेविश्वात पदार्पण करतो आहे. तसेच या सिनेमात सारा अली खान आणि निमरत कौरदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. यात अभिनेता अक्षय कुमारने विंग कमांडर कुमार ओम आहूजा यांचे पात्र साकारले आहे.

अक्षय कुमारची फ्लॉप कामगिरी

अभिनेता अक्षय कुमार एक प्रसिद्ध अभिनेता असला तरीही फ्लॉपचा शेरा कसा असतो? हे त्याने जवळून अनुभवले आहे. त्याने शेवटचा हिट सिनेमा 2021 मध्ये दिला होता. ज्याचे नाव ‘सूर्यवंशी’ त्याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. यानंतर त्याचा ‘सेल्फी’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘सरफिरा’, ‘खेल खेल में’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘मिशन रानीगंज’, ‘राम सेतु’ आणि ‘बच्चन पांडे’ यांसारखे बिग बजेट सिनेमे सपशेल आपटले. यानंतर आता ‘स्काय फोर्स’च्या कमाईचा फोर्स पाहता अक्षय कुमार पुन्हा एकदा हिट सिनेमाकडे वाटचाल करतोय असे दिसत आहे.

हेही पहा –

Sonu Nigam : पद्म पुरस्कारांवर प्रसिद्ध गायक सोनू निगमची नाराजी, म्हणाला