चित्रपटानंतर अक्षय कुमार राजकरणात? म्हणाला, एक अभिनेता म्हणून…

लंडनच्या इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अक्षय कुमारने हजेरी लावली होती, या कार्यक्रमात त्याला भविष्यात राजकरणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार वारंवार त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. तर कधी त्याच्या वादग्रस्त जाहिरांतीमुळे चर्चेत असतो. मात्र या वेळी तो राजकारणात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने नव्याने चर्चेत आला आहे. खरंतर लंडनच्या इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अक्षय कुमारने हजेरी लावली होती, या कार्यक्रमात त्याला भविष्यात राजकरणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अक्षय कुमारने आपलं मत मांडलं.

“भविष्यात राजकारणात तुम्हाला सहभागी व्हायला आवडेल का?’ असा प्रश्न अक्षय कुमारला विचारण्यात आला तेव्हा, तो म्हणाला की, मी समाजासाठी जे गरजेचं आहे ते चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न करेन. मी चित्रपट बनवून खूप खूश आहे. एक अभिनेता म्हणून मी समाजातील प्रकरणांवर चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी १५० चित्रपटांची निर्मीती केली होते. मात्र रक्षाबंधन हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. मी व्यावसायिक चित्रपटांची निर्मीती करतो. पण त्यासोबतच सामाजिक मुद्यांवर चित्रपट निर्मिती करण्याचाही माझा भर असतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान, अक्षय कुमारला याआधी सुद्धा अनेकदा राजकारणात प्रवेश करणार का हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने यावर कोणताही विचार केला नसल्याचे सांगितले होते. तसेच मला चित्रपटांमध्ये काम करायला आवडतं आणि यातच मी खूश आहे.


 

हेही वाचा :एक चविष्ट ‘संजय राऊत’… किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत