Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन शूट करताना अक्षय कुमारच्या पायाला दुखापत

चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन शूट करताना अक्षय कुमारच्या पायाला दुखापत

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या स्कॉटलँड येथे त्याच्या आगामी ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना अक्षयचा अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता टायगर श्रॉफसोबत एक अॅक्शन सीन शूट करताना अक्षयला ही दूखापत झाली. यावेळी गुडघ्याला जखम झाली, मात्र त्याने दुखापतीनंतर शूटिंग थांबवण्याचे निर्णय न घेता क्लोज अप शॉट्स शूट करायचे ठरवले आहे. खरं तर, अक्षय नेहमीच त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये स्वतःचे स्टंट करतो. तो कधीही स्टंटसाठी बॉडी डबल वापरत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

दरम्यान, ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटात अक्षय आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच अक्षय आणि टायगरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अक्षयचे आगामी चित्रपट

‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटा व्यतिरिक्त अक्षय ‘हेरा फेरी 3’ चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. शिवाय तो मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच ‘सोरारई पोटरू’च्या हिंदी रिमेकमध्ये देखील अक्षय काम करणार आहे.


हेही वाचा :

बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -