‘सत्याचा नेहमीच विजय होतो’, बॉलिवूडकरांनी केलं सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत!

akshay,kangana,ankita reaction on suprim court
अक्षय कुमार,कंगना,अंकिताने दिली सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रीया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टाने आज हा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयावर बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.

कोर्टाच्या या निकालावर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेने प्रतिक्रीया दिली आहे. तीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “अखेर सत्याचा विजय झाला. न्यायाच्या दिशेने पहिलं पाऊल…” अशा आशयाचं ट्विट करुन अंकिता लोखंडेने न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तर माणूसकीचा जिंकली असं म्हणत कंगानाने सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. ‘माणूसकी जिंकली एसएसआर योद्ध्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या एकीचा विजय झाला.’अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने केला आहे.

त्याचबरोबर इतके दिवस या प्रकरणावर गप्प असलेल्या अभिनेता अक्षय कुमारनेही यावर आता प्रतिक्रीया दिली आहे. ‘सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे सीबीआयला निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सत्याचा विजय होईल’ अशी प्रतिक्रीया अक्षयने ट्विट करत दिली आहे.

 

तर दिग्दर्शक मधूर भांडाकर यांनी देखील ट्विट करत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.


हे ही वाचा – ‘मुंबई पोलिसांविरोधात हे षडयंत्र’, संजय राऊतांची सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया