Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अक्षय कुमारने ठेवला भारताच्या नकाशावर पाय; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

अक्षय कुमारने ठेवला भारताच्या नकाशावर पाय; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Subscribe

अक्षयने नॉर्थ अमेरिकेच्या टूर प्रमोशनचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा आणि नोरा फतेही देखील दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. विविध चित्रपटांच्या माध्यमातून अक्षय प्रेक्षकांचे मन जिंकत असतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून अक्षयला विविध कारणांमुळे सतत ट्रोल केलं जातं. याचं कारणामुळे 2022 मधील अक्षयचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. दरम्यान, आता 2023 मध्ये देखील अक्षय पुन्हा एकदा वादाच्या कचाड्यात सापडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

नुकताच अक्षयने नॉर्थ अमेरिकेच्या टूर प्रमोशनचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा आणि नोरा फतेही देखील दिसत आहेत. या व्हिडीओत हे सर्वजण पृथ्वीवर चालताना दिसत आहेत. मात्र, यात अक्षने पृथ्वीवर चालताना भारताच्या नकाशावर पाय दिला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अक्षयवर संतापले असून अनेकजण आता त्याला ट्रोल करु लागले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

सध्या या व्हिडीओमुळे संतापलेले नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत. त्यातील एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “देशभक्तीचे चित्रपट बनवणाराच आता स्वतःच्या देशावर पाय देत आहे”, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय की, “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे पण तुम्ही देशाच्या नकाशावर पाय देऊन खूप मोठी चूक करत आहात.”


हेही वाचा : 

6 फेब्रुवारी नाही तर ‘या’ दिवशी होणार आहे कियारा-सिद्धार्थचं लग्न

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -