Shane Warne च्या निधनामुळे बॉलिवूड हळहळले; अक्षय-रणवीरपासून, शिल्पा-सनीपर्यंत अनेकांनी व्यक्त केला शोक

akshay kumar ranveer singh shilpa shetty sunny deol dollywood celebs mourns on shane warn death
Shane Warne च्या निधनामुळे बॉलिवूड हळहळले; अक्षय-रणवीरपासून, शिल्पा-सनीपर्यंत सर्वांनी व्यक्त केला शोक

52 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनाने त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांना शेनच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. वॉर्न हा थायलंड येथील कोह सामुई येथे असताना त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती त्याच्या मॅनेजमेंट करणाऱ्या संस्थेने दिली आहे. त्यानंतर याबाबतचे पहिले वृत्त फॉक्स क्रिकेटने दिले आहे.

वॉर्नने आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्वात एक वेगळी जादू निर्माण केली होती. क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा मानही वॉर्नला मिळाला होता. शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने क्रिकेट विश्वासह आता सर्व बॉलिवूड सेलिब्रेटींकडूनही हळहळ व्यक्त केली जातेय. तसेच त्याच्या आत्म्यास शांती लाभे अशी प्रार्थना केली जातेय.

क्रिकेटच्या मैदाबरोबरचं त्याच्याविषयी अनेक चर्चा रंगल्या. अनेक अभिनेत्रींबरोबर त्याचे संबंध असल्याचे म्हटले गेले. पण त्याने कशाचाही विचार केला नाही. मैदानाबाहेरील वॉर्नच्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या, पण त्यामुळे त्याची कुप्रसिद्धी कधीही झाली नाही. शेन वॉर्नचे बॉलिवूडसोबत एक विशेष नाते होते, त्याने बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्रींसोबत विविध प्रोजेक्टमध्ये काम केलेय.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीन देखील शेन वॉर्नसोबत काम केले आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पहिल्या सत्रात सिझनमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला. शिल्पा शेट्टीने दिवंगत क्रिकेटरशेन वॉर्नसोबतचे स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, लीजेंड्स लिव ऑन @shanewarne23 #ShaneWarne.”

रणवीर सिंहने ‘हार्टब्रोकन’ इमोजीसह लेग-स्पिनरचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

लव्ह हॉस्टल स्टार विक्रांत मॅसीला वॉर्नच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्काच बसला. त्याने ट्विट करत लिहिले की, “नक्कीच धक्का बसला!!! तुम्ही प्रत्येक 90 च्या दशकातील मुलाचा एक तुकडा तुमच्यासोबत घेतला आहे. आठवणींसाठी धन्यवाद. धन्यवाद. फाडून टाका.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

अक्षय कुमारने ट्विट केले आहे की, “शेन वॉर्नच्या अकाली निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. या व्यक्तीमुळे पूर्णपणे प्रभावित झाल्याशिवाय तुम्ही क्रिकेटच्या खेळाच्या प्रेमात पडू शकत नाही. हे हृदय तोडणारे आहे. ओम शांती”

आपल्या चाहत्यांसह आस्क मी एनेथिंग सेशन करत असताना गायक अरमान मलिक क्रिकेटपटू वॉर्नच्या निधनाची बातमी ऐकताच थांबला आणि त्यानेही शोक व्यक्त केला आहे. अरमान मलिकने ट्विट करत लिहिले की, “मी कधीच क्रिकेटचा चाहता नव्हतो, पण त्याला माझ्या टीव्ही स्क्रीनवर पाहून आणि त्याच्या कलेने प्रभावित होऊन मी खरोखरच मोठा झालो आहे. होय, तो केवळ गोलंदाज नव्हता, तर तो मैदानावरील कलाकार होता. खेळाच्या जगाच्या वास्तविक दंतकथा. हे खूप हृदयद्रावक आहे..’

सनी देओलने ट्विट करत लिहिले की, क्रिकेट जगताने एक रत्न गमावला आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, दिग्गज शेन वॉर्न, खूप लवकर सोडून गेलास. प्रार्थना.

प्रेमाने वॉर्नी म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न हा 708 टेस्ट मॅचमध्ये विकेट घेत सर्वात महान लेग-स्पिनर बनला होता. त्याने 293 वनडे विकेट्स देखील घेतल्या होत्या.

शेन वॉर्न ज्याच्या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ म्हणून दर्जा देण्यात आला, त्याने अनेक वेळा आपल्या टीमला केवळ कठीण परिस्थितीतूनचं बाहेर काढले नाहीतर त्याने टीमला विजयापर्यंत नेले. वॉर्नने आपल्या कारकिर्दीत 145 टेस्ट मॅचच्या 273 इनिंग्समध्ये 708 विकेट घेतल्या. टेस्ट मॅचमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 2.65 होता. वन डे मॅचबद्दल बोलायचे झाले, त्याने 194 मॅचमध्ये 293 विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्येही त्याचा इकॉनॉमी रेट 4.25 आहे, जो खूप चांगला मानला जातो.


ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचं निधन