ऋचा चड्ढाच्या ट्विटवर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने केलेल्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. ऋचावर भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋचाने तिच्या ट्वीटमध्ये भारतीय सेनेच्या उत्तरी सेनेचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत चीनच्या सीमेचे गलवानमध्ये समोर आलेल्या एका जुन्या घटनाक्रमासोबत जोडले होते. ऋचाच्या त्या ट्वीटनंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने देखील ऋचाचे ट्वीटचे स्क्रिनशॉर्ट शेअर करत तिची निंदा केली आहे.

अक्षय कुमारने शेअर केलं ट्वीट

भारतीय सेनेबाबत ऋचा चड्ढाच्या या ट्वीटचे स्क्रिनशॉट शेअर करत अक्षयने लिहिलंय की, “हे पाहून दुःख झाले. आपली भारतीय सेनेबाबत असं काहीही व्हायला नको, आज ते आहेत म्हणून आपण आहोत.” अक्षयची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी अक्षयचं कौतुक करत आहेत.

ऋचाने केला होता भारतीय लष्कराचा अपमान
उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, भारतीय सेना पाकिस्ताकडे असलेला काश्मीर परत घेण्यासाठी सज्ज आहे. भारत आम्हाला जो आदेश देईल तो आम्ही पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. याचं व्यक्तव्याचा संदर्भ देत ऋचाने देखील ट्वीट केलं. त्यात तिने लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’, तिच्या या वादग्रस्त वक्यव्यामुळे अनेकांकडून तिच्यावर टिका केली जात आहे.

ऋचाने मागितली माफी
या वादग्रस्त वक्तव्यानंतर ऋचा चड्ढाला अनेकांकडून ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, आता या प्रकरणाबाबत ऋचाने सोशल मीडियावर माफी मागितली आहे. तिने तिच्या ट्वीट अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर माफी मागितली. त्यात तिने लिहिलंय की, “माझा उद्देश सेनेचा अपमान करण्याचा नव्हता. माझ्या तीन शब्दांना वादात ओढण्यात आलं. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते. माझे आजोबा स्वतः भारतीय सेनेत होते आणि लेफ्टिनेंट कर्नल होते. भारत-चीन युद्धामध्ये त्यांना गोळी लागली होती. माझे मामा देखील सेनेत होते. हे माझ्या रक्तातच आहे. जर सेनेतील जवान शहीद होत असेल तर त्यामुळे त्याचे कुटुंबीय प्रभाविक होतात. हा माझ्यासाठी एक भावनिक मुद्दा आहे.”

 


हेही वाचा :

मोस्ट पॉप्युलर फीमेल स्टारमध्ये समंथा प्रथम क्रमांकावर; बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकलं मागे