घरताज्या घडामोडी'माझी महाराष्ट्रीयन गर्लफ्रेंड होती तिने मला...' अक्षय कुमारने थुकरटवाडीत सांगितलं सिक्रेट

‘माझी महाराष्ट्रीयन गर्लफ्रेंड होती तिने मला…’ अक्षय कुमारने थुकरटवाडीत सांगितलं सिक्रेट

Subscribe

खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या मराठीविषयी केलेला खुलासा ऐकून मंचावर एकच हशा पिकला.

बॉलिवूड स्टार खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा सूर्यवंशी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि सूर्यवंशीची संपूर्ण टीम पोहचली महाराष्ट्राच्या लाडक्या चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीत. थुकरटवाडीतील सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनचा एका प्रोमो रिलीज झालाय. ज्यात अक्षय कुमार, कतरीना कैफ, रोहीत शेट्टी,जॅकी श्राफ विनोदविरांच्या हास्य धमाक्याची मजा लुटताना दिसत आहेत. चला हवा येवू द्याच्या मंचावर आल्यानंतर डॉ. निलेश साबळे सर्वांनाच बोलतं करतो. यावेळी निलेश साबळेनी अक्षय कुमारला सिनेमाविषयी तसेच काही वैयक्तिक प्रश्न देखील विचारले. ज्यावर अक्षय कुमारने फार मजेशीर उत्तर दिले आणि एक महत्त्वाचा खुलासा देखील केला.

अक्षय कुमार बॉलिवूड सिनेमात काम करत असला तरी त्याचे मराठी आणि मराठी भाषेवरील प्रेम सर्वांनाच माहिती आहे. हवा येऊ द्याच्या मंचावर अक्षय कुमार नेहमीच मराठीत बोलताना आपण पाहिलं आहे. यावेळी निलेश साबळेनी अक्षयला ‘तुम्ही इतकं उत्तम मराठी कसं काय बोलता? इतकं उत्तम मराठी येण्यामागचे कनेक्शन काय?’, असा प्रश्न विचारला आणि अक्षयने देखील फार हसत खेळत निलेशच्या प्रश्नाचे उत्तर दिले. अक्षयच्या उत्तराने मंचावर सगळेच अवाक झाले.

- Advertisement -

अक्षयने उत्तर देत म्हटले, ‘खरंतर फार वर्षांपूर्वी माझी एक महाराष्ट्रीय गर्लफ्रेंड होती. मी तिच्या घरी सतत येत जात होतो. तिथेच मी मराठी शिकलो. तुम्हाला जर एखादी भाषा शिकायची असेल तर हा सर्वांत उत्तम मार्ग आहे’, असे गमतीशीर उत्तर यावेळी अक्षयने दिले. खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या मराठीविषयी केलेला हा खुलासा ऐकून मंचावर एकच हशा पिकला.

हवा येऊ द्याच्या मंचावर अक्षयसोबत  जॅकी श्राफ, कतरीना कैफ आणि रोहीत शेट्टीही उपस्थित होते. तिघांनीही हवा येऊ द्याच्या विनोदविरांसोबत फार धम्माल केली. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे कलाकारांची नक्कल करताना दिसले. सूर्यवंशी हा सिनेमा येत्या १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर चला हवा येऊ द्यामध्ये विनोदविरांनी कलाकारांसोबत केलेली धम्माल येत्या १,२ आणि ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अरुंधतीच्या आयुष्यात येणार जुना मित्र, मालिकेत होणार नव्या पात्राची एंट्री

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -