घरमनोरंजनअक्षय कुमारचा पुन्हा एकदा आगीशी खेळ

अक्षय कुमारचा पुन्हा एकदा आगीशी खेळ

Subscribe

अक्षय कुमार खतरोके खिलाडी सिजन ९ च्या फायनलमध्ये शोचा होस्ट रोहीत शेट्टी सोबत एक धाडसी स्टंट करताना दिसणार आहे.

बॉलिवूडचा स्टंटमैन, खिलाडी अक्षय कुमार नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असतो. कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या खतरो के खिलाडी कार्यक्रमाच्या फायनलमध्ये तो कार्यक्रमाचा होस्ट रोहीत शेट्टी सोबत एक धाडसी स्टंट करताना दिसणार आहे. नुकताच अक्षयने या संबंधीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी दोघांच्याही बाजूला जळणाऱ्या गाड्या दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये  त्याने ‘माझ्या बायकोला सांगू नका’, असे लिहिले आहे.

- Advertisement -

काय म्हणाला अक्षय

खतरों के खिलाडीच्या सेटवरुन अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये हा धाडसी लोकांसाठीचा केसरी आठवडा आहे. तेंव्हा रोहीत शेट्टी सोबत खतरों के खिलाडीची फायनल पाहायला विसरु नका. यानंतर खाली त्याने स्मायली सिंबॉल टाकत माझ्या बायकोला सांगू नका असे लिहिले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने आपल्या एका नविन कार्यक्रमाचे प्रमोशन करताना, कपड्यांना आग लावून रॅम्प वॉक केला होता. अक्षयने केलेल्या या स्टंट नंतर सोशल मीडियावरुन त्याची पत्नी आणि अभिनेत्री असलेल्या ट्विंकल खन्नाने त्याला चांगलेच झाडले होते.

ट्विंकल खन्ना भडकली

अक्षयने कपड्यांना आग लावल्याचा स्टंट केल्याने ट्विंकल खन्नाने ट्विट करताना ‘तू यातन वाचलास तर घरी ये, मीच तुला मारुन टाकते’ असे ट्विट केले होते. यावर प्रतिक्रिया देताना अक्षयने ‘मी खरंच घाबरलो’, असे ट्विट केले होते. दरम्यान, २१ मार्चला अक्षय कुमारचा केसरी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या प्रमोशन साठीच तो हे सगळे करत असल्याचे बोलले जात आहे. खतरों के खिलाडी ९ चा अंतिम भाग लोकांना १० मार्चला रात्री ९ वाजता कलर्स वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -