Atarangi re Trailer Poster: ट्रेलर आधीच अक्षय कुमारने शेअर केलं अतरंगीचं मजेदार पोस्टर

पोस्टरमध्ये चक्क सारा नवरी आणि धनुष नवऱ्याच्या वेशात दिसतोय.

akshay kumar sara ali khan dhanush fem Atrangi re Trailer Poster launch
Atarangi re Trailer Poster: ट्रेलर आधीच अक्षय कुमारने शेअर केलं अतरंगीचं मजेदार पोस्टर

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा धमाकेदार आणि बहुचर्चित सिनेमा ‘अतरंगी रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलरही पहायला मिळणार आहे. मात्र ट्रेलर लाँच होण्याआधीच खिलाडी अक्षय कुमारने अतरंगी सिनेमाचे एक अतरंगी ट्रेलर पोस्टर शेअर केले आहे. जे पाहून प्रेक्षकांची सिनेमाप्रती असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे. अक्षयने शेअर केलेले सिनेमाचे पोस्टर फार मजेदार आहे. ज्यात अक्षय कुमार सारा अली खान आणि धनुष तिघेही अतरंगी अंदाजात दिसातयत. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये चक्क सारा नवरी आणि धनुष नवऱ्याच्या वेशात दिसतोय. धनुषला काही लोकांनी धरुन ठेवलय तर सारा चक्क नवरीच्या वेशात झोपलेली पहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

सिनेमात आतापर्यंत सारा अली खान,अक्षय कुमार आणि धनूष हे तिघेच समोर आले होते. मात्र सिनेमाच्या या नव्या पोस्टरमध्ये सिनेमातील इतर कलाकारही समोर आले आहेत. अतरंगी रे सिनेमात अभिनेत्री सारा अली खान रिंकू नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर धनूष विशू हे पात्र साकारणार आहे.

 

 

अतरंगी रे सिनेमाचे डिरेक्शन आनंद एल राय यांनी केलेय. तर ए आर रहमानने सिनेमाला म्युझिक दिले आहे. सिनेमाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप सांगण्यात आलेली नाही. सिनेमा थिएटरमध्ये नाही तर डिझ्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

 

आतापर्यंत सिनेमाचे तीन मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. सारा अली खानचे सिनेमातील तीन वेगवेगळे लुक देखील यातून पहायला मिळाले आहेत. सिनेमाची स्टोरी फार सुंदर असल्याचे अक्षय कुमारने एका मुलाखतीत सांगितले होते.


हेही वाचा – Amol Palekar Birthday: ‘एँग्री यंग मॅन’च्या काळातील ‘कॉमन मॅन’