Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन शिवाजी महाराजांच्या मागे बल्बचे झुंबर कुठून आले? अक्षयच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची टीका

शिवाजी महाराजांच्या मागे बल्बचे झुंबर कुठून आले? अक्षयच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची टीका

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार वारंवार त्याच्या नवनवीन चित्रपटांमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अक्षय येत्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटामध्ये अक्षय छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तसेच अक्षयसारख्या बॉलिवूड अभिनेत्याला या चित्रपटामध्ये शिवरायांची भूमिका दिल्याबद्दल काही राजकीय पक्षांनी तसेच मराठी प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली असून शूटिंगमधील एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. मात्र, आता तो व्हिडीओ मधील काही दृष्यांना देखील नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

अक्षयच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या टीका

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होताच अक्षयने शिवाजी महाराजांच्या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला. मात्र, आता नेटकरी या व्हिडीओला देखील ट्रोल करु लागले आहेत.

 

- Advertisement -

ट्रोलर्सच्या मते, या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात असून तो सिंहासनावरुन खाली चालत येताना त्याच्या मागे एक बल्बचे झुंबर दिसत आहे. बल्बचं झुंबर दिसत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी 1640 ते 1680 या काळात साम्राज्य केलं आणि थॉमस एडिसनने 1880 मध्ये बल्बचा शोध लावला होता. मग शिवाजी महाराजांच्या काळात हा बल्ब कुठून आला? असा प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत.

अक्षय व्यतिरिक्त हे कलाकारही चित्रपटात असणार मुख्य भूमिकेत
‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त विराज मडके, तुळजा जामकर, जय दुधाणे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रवीण तरडे हे कलाकार देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारतील. डिसेंबरपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, वर्ष 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 


हेही वाचा :

छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणे माझे भाग्य… अक्षय कुमारची पोस्ट चर्चेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -