Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनAkshay Kumar : महाकुंभात पोहोचला अक्षय कुमार, त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान

Akshay Kumar : महाकुंभात पोहोचला अक्षय कुमार, त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान

Subscribe

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची दोन दिवसांनी सांगता होईल. तत्पूर्वी सोमवारी बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने महाकुंभ मेळ्याला हजेरी लावल्याचे समजत आहे. महाकुंभाच्या 43 व्या दिवशी अभिनेत्याने त्रिवेणी संगमावर गंगेत पवित्र स्नान केले. त्याचे प्रयागराजला पोहोचतानाचे अनेक फोटो तसेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अक्षय कुमारने उत्तर प्रदेश सरकारच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. त्यासोबत मुख्यमंत्री योगींचें आभारदेखील मानले आहेत. (Akshay Kumar Take Holy Dip In Mahakumbh 2025)

अक्षयने केले पवित्र स्नान

महाकुंभमेळा 2025 मध्ये आतापर्यंत अनेक कलाकार मंडळींचा समावेश दिसून आला. ज्यात आता अभिनेता अक्षय कुमारचीदेखील भर पडली आहे. कडक सुरक्षेत अभिनेत्याने त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आणि यावेळी त्याने माध्यमांशीही संवाद साधला.

तो म्हणाला, ‘यापूर्वी प्रयागराजमध्ये जेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जायचे तेव्हा इतक्या चांगल्या व्यवस्था नव्हत्या. पण यावेळी कुंभमेळ्यात मुख्यमंत्री योगींनी खूप चांगली व्यवस्था केली आहे. अगदी अंबानी, अदानीपासून ते बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांना इथे संगमात स्नान करण्याची संधी मिळाली आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो’.

महाकुंभमेळ्यात पोहोचले बॉलिवूडचे कलाकार

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारी 2025 पासून झाली. येत्या 26 फेब्रुवारी 2025 रोजी या भव्य सोहळ्याची सांगता होईल. आतापर्यंत या भक्ती सोहळ्यात असंख्य भाविकांची उपस्थिती पहायला मिळाली. यानंतर आता अवघे 2 दिवस उरले असतानाही भाविकांची गर्दी जैसे थे दिसते आहे. यंदा महाकुंभ मेळ्यात सामान्य भाविकांसह अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूडचे कलाकार सामील झाल्याचे पहायला मिळाले. ज्यामध्ये अनुपम खेर, सोनाली बेंद्रे, मिलिंद सोमण, रेमो डिसूझा, तमन्ना भाटिया, गुरु रंधावा, पूनम पांडे, हेमा मालिनी, तनिषा मुखर्जी, निमरत कौर आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.

हेही पहा –

Mrunal Thakur : नवरी नटली, मृणाल ठाकूरचं लग्न झालं? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण