अभिनयक्षेत्रात काम केल्यानंतर बॉलिवूडचा खिलाडी ‘या’ क्षेत्रात करणार पदार्पण

अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा म्यूझिक व्हिडिओमध्ये करणार पदार्पण

अभिनेता अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचे नाव हा बहुआयामी अभिनेता म्हणून त्याची ओळख अभिनय क्षेत्रात आहे. अक्षयने हिंदी चित्रपटसृष्टीला विनोदी, अॅक्शन, ड्रामा यांसारखे अनेक चित्रपट दिले. मात्र आता अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा म्यूझिक व्हिडिओमध्ये पदार्पण करणार आहे. पंजाबी सिंगर बी प्राकने केसरी चित्रपटामध्ये ‘तेरी मिट्टी’ हे गाणं गायलेल्या गायकासोबत अक्षय कुमार काम करणार आहे.

लवकरच बी प्राक या गायकाचे नवं गाणं येणार असून त्याचे नाव ‘फिलहाल’ असणार आहे. हेच अक्षयचे म्यूझिक व्हिडिओतील पदार्पण असेल. यामध्ये पंजाबी गायक आणि अभिनेता एमी वर्क तसेच नुपुर सनन दिसणार आहे.

अक्षय कुमारने याविषयी बोलताना असे सांगितले की, ‘यापूर्वी केसरी या चित्रपटातील तेरी मिट्टी हे गाणं प्राकसह केलं होतं त्यामुळे ‘फिलहाल’ साठी काम करताना अधिक वेळ लागला नाही. उत्तम आवाज आणि गाण्याच्या ओळीसह माझे म्युझिक व्हिडिओमध्ये पदार्पण झाले आहे.’