घरमनोरंजनऐश्वर्यानंतर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर!

ऐश्वर्यानंतर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर!

Subscribe

अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालं आहे. अक्षय कुमारने सोशलमिडीयावर चित्रपटाचे तीनही पोस्टर प्रदर्शित केले आहेत. या एका पोस्टरमध्ये दोन मुलींच्या बेबी बंप मध्ये तो फसलेला दिसत आहे. अक्षयच्या या वर्षीच्या चित्रपटांना गुफ अप ऑफ द इयर असे म्हटले आहे. चित्रपट डिसेंबरमध्ये ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. २७ डिसेंबर २०१९ ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

- Advertisement -

 

हे पोस्टर शेअर करत अक्षयने लिहीले आहे की,या ख्रिसमसच्या सुट्टीत काहीतरी धम्माल तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्याने या चित्रपटातील सगळ्या कलाकारांना टॅग केलं आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये एका ठिकाणी करीना कपूर आणि दुसऱ्या ठिकाणी कियारा अडवाणी दिसत आहे. या दोनही अभिनेत्री बेबी बम्प फ्लॉन्ट करत आहे. ९ वर्षानंतर करीना आणि अक्षय एकत्र दिसणार आहेत.

- Advertisement -

या चित्रपटात अक्षय कुमार आणि करिनाची जोडी आहे. या आधी कमबख्त इश्कमध्ये दोघं एकत्र झळकले होते. आता ९ वर्षानंतर गुड न्यूजमध्ये एकत्र दिसणार आहेत. अक्षय कुमार, करिना कपूर,कियारा अडवाणी,दिलजीत दोसांझ मुख्य भुमिकेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -