अक्षयकुमारच्या ‘भूल भुलैय्या’चा १२ वर्षांनी येणार सिक्वल

मागील काही वर्षापासून या चित्रपटाचा सिक्वल येण्याची चर्चा सुरू होती, मात्र आता तब्बल १२ वर्षांनी भूल भुलैय्याचा सिक्वल तयार करण्यात येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारचा हॉरर तसेच कॉमेडी असणारा भूल भुलैय्या हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अक्षयच्या विनोदी भूमिकेमुळे या चित्रपटास प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. मागील काही वर्षापासून या चित्रपटाचा सिक्वल येण्याची चर्चा सुरू होती, मात्र आता तब्बल १२ वर्षांनी भूल भुलैय्याचा सिक्वल तयार करण्यात येणार आहे.

मुंबई मिररच्या माहितीनुसार, चित्रपट-संगीत निर्माता भूषण कूमार यांनी या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याचे सांगितले होते. त्यांना काही काळापासून भूल भुलैय्या चित्रपटाचा भाग २ तयार करायचा होता. या चित्रपटाची कथा लिहीणारे फरहाद सामजी यांच्यासोबत ही कल्पना त्यांनी शेअर केली होती. फरहाद सामजी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या आगामी सिक्वलमध्ये नवीन चेहरे दिसणार असल्याची चर्चा होत आहे. भूल भुलैय्या या चित्रपटाच्या सिक्वलची फायनल स्क्रिप्ट पुर्ण झाल्यावर कास्टिंग सुरू होणार आहे. अक्षयने नव्या हॉरर-कॉमेडी चित्रपट लक्ष्मी बॉम्बच्या शूटिंगची सुरूवात केली आहे, जो तमिळ चित्रपट कंचनाचा रिमेक आहे. यामध्ये कियारा आडवाणी अक्षयसोबत दिसणार आहे.

२००७ ला आलेला भूल भुलैय्या हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट रजनीकांत स्टारर चंद्रमुखीचा हिंदी रिमेक होता. त्यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, शाइनी आहूजा आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत दिसले होते.या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. मात्र या आगामी भूल भुलैय्याच्या सिक्वलमध्ये अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे.

यासोबतच अक्षय कुमार लवकरच ‘गुड न्यूज’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे ही काम चालू आहे. सध्या ‘मिशन मंगल’ आणि ‘हाउसफुल ४’ या दोन्ही चित्रपटाच्या शुटिंमध्ये ही अक्षय व्यग्र आहे.