बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आज 56 वा वाढदिवस आहे. याचं निमित्ताने अक्षय आज उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी त्याने पहाटेची भस्म आरती देखील केली. यावेळी अक्षयसोबत त्याचा मुलगा आरवदेखील होता. शिवाय अक्षय कुमारसोबत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवनही महाकाल मंदिरात पोहोचला होता.
Today is #AkshayKumar‘s birthday and he started his day with bhasma aarti at mahakal temple in ujjain with his son Aarav and friend Shikhar Dhawan. har har mahadev.#HappyBirthdayAkshayKumar pic.twitter.com/jepXgTXx1E
— ♔ (@Darsh_Official_) September 9, 2023
नुकताच सोशल मीडियावर अक्षयचा मंदिरातील व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने नारंगी रंगाचे सोवळं नेसलं आहे. शिवाय कपाळावर चंदनाचा टिळा देखील लावलेला आहे. मंदिरात सुरु असलेल्या महाकालच्या भस्म आरतीमध्ये अक्षय, आरव आणि शिखर धवन तल्लीन झालेले दिसत आहेत. अक्षयच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.
‘या’ चित्रपटामुळे अक्षय सध्या चर्चेत
अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसर येथे झाला. या अभिनेत्याने 1991 मध्ये ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मागील काही दिवसांपूर्वी अक्षयचा ‘OMG 2’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमारने या चित्रपटात देवदूताची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.