घरताज्या घडामोडीBachchan Pandey : अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

Bachchan Pandey : अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

Subscribe

साजिद नाडियाडवालाचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’ वर सध्या प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता बाकी अनेक व्यवहार ठप्प करण्यात आले होत.त्यामुळे चित्रपटांच्या शूटिंगवरही कोरोनाचे निर्बंध जारी करण्यात आले. मात्र, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा बहुप्रतिक्षित सिनेमाची आतुरता आता संपणार आहे.

साजिद नाडियाडवालाचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’ वर सध्या प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता अनेक व्यवहार ठप्प करण्यात आले होत. त्यामुळे चित्रपटांच्या शूटिंगवरही कोरोनाचे निर्बंध जारी करण्यात आले. मात्र, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ या बहुप्रतिक्षित सिनेमाची आतुरता आता संपणार आहे. कारण अक्षयने या सिनेमीची रिलीज डेट प्रेक्षकांना सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी पाहता प्रेक्षकांना हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहण्याची संधी मिळणार आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा ‘बच्चन पांडे’ हा मार्च महिन्यात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर बच्चन पांडे या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करत आपल्या चाहत्यांना याची माहीती दिली आहे. याअगोदर,बच्चन पांडे 4 मार्चला रिलीज होणार होता. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे आता हा सिनेमा 18 मार्च रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

या सिनेमामधून अक्षयचा खास लूक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयने सिनेमाचेे पोस्टर शेअर करत, ‘अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा’…‘लोडिंग दिस होळी.’ ,अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. अक्षय पोस्टरमध्ये एका जीपच्या बोनेटवर बसून त्याच्या टीमसोबत पाहायला मिळत आहे.  काही दिवसांपूर्वी अक्षय आणि क्रितीचा या चित्रपटातील जबरदस्त लूक क्रिती सेनॉनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांच्या सिनेमातील लूकला चाहत्यांनी पसंती दाखवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

 

 


हे ही वाचा – Unpaused Naya Safar: ‘अनपॉज्ड: नया सफर’ मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -