देशाची विभागणी करू नका, बॉलिवूड-साऊथ वादावर अक्षय कुमारचे मत

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याने बॉलिवूडला मी परवडणार नाही असे म्हटले होते. त्यावरूनही सोशल मीडियावर मोठा वादंग झाला होता.  त्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप याने हिंदी भाषेवरून जे वक्तव्य केले. त्यामुळे सुद्धा तो चर्चेत आला होता.

KV Vijayendra Prasad has written the script of Akshay Kumar Roddy Rathore 2
राउडी राठोड २ मधून पुन्हा एकदा अक्षय कुमार जलवा

बॉलिवूडमधील महत्वपूर्ण अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अक्षय कुमार. सोशल मीडियावर अक्षयचे अनेक चाहते आहेत. सिनेसृष्टीत जे काही घडते त्यावर अक्षय स्वतःचे स्पष्ट मत मांडत असतो. असेच मत त्याने बॉलिवूड आणि साऊथ वादावर मांडले आहे.  आपण सगळे एकच आहोत. सगळे चित्रपट आपलेच आहेत. त्यामुळे बॉलिवूड आणि साऊथ असा वाद करू नका. देशाची विभागणी करू नका. ते काम इंग्रजांचे आहे ते त्यांनी केले, असे मत पृथ्वीराज या चित्रपटाच्या  प्रमोशनवेळी अक्षय कुमारने अक्षय कुमारने व्यक्त केले.

अक्षय म्हणाला की, आपण असे नको करूया आणि त्याबाबत इतर मंडळी काय बोलत आहेत त्यांच्या मला काहीच देणेघेणे नाही. मी सहसा कोणत्या गोष्टीवर बोलत नाही पण गेल्या काही दिवसांपासून मी पाहतोय की बाॅलीवूड आणि साऊथ या दोन चित्रपटसृष्टींमध्ये वाद सुरु आहे. प्रत्येक दिवशी काही न काही नवा मुद्दा समोर येत आहे. त्यामुळे मी आज हे बोलतोय. चित्रपट हे दोन्ही ठिकाणचे हिट ठरतात पण भाषिक वाद थांबण्याचे नाव घेत नाही. जेव्हा ब्रिटिश भारतात आले होते तेव्हा सुद्धा त्यांची भारताचे ईस्ट इंडिया, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया असे विभाजन केले होते. पण आता स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरीही हा वाद मिटत नाही. पण निदान आपण तरी असे नाही करायला पाहिजे. आपण सगळे एकच इंडस्ट्री आहोत तर त्याच भावनेने आपण राहिले पाहिजे आणि दोन्हीकडचे चित्रपट तेवढेच हिट झाले पाहिजेत असेही अक्षय कुमार म्हणाला.

बॉलिवूड विरुद्ध साऊथ यांच्यामधील कोल्ड वॉर गेले अनेक दिवस सुरु आहे. प्रत्येक जण स्वतःचीच बाजू बरोबर आहे हे सिद्ध करताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांमधील घडामोडी सांगायच्याच झाल्या तर दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याने बॉलिवूडला मी परवडणार नाही असे म्हटले होते. त्यावरूनही सोशल मीडियावर मोठा वादंग झाला होता.  त्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप याने हिंदी भाषेवरून जे वक्तव्य केले. त्यामुळे सुद्धा तो चर्चेत आला होता. त्यावर बॉलिवूड अभिनेता आज देवगण याने त्याला प्रत्त्युत्तर दिले होते. हा सगळा वाद आणि त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती. त्यातच बॉलिवूडचा राऊडी राठोड अक्षय कुमार याने सुद्धा आपली तटस्थ भूमिका स्पष्टपणे मांडली.

दरम्यान, अक्षय कुमार हा आगामी पृथ्वीराज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान हे मुख्य पात्र साकारत आहे. या चित्रपटात मनुशी छिल्लर सुद्धा झळकणार आहे.