सलमान आणि अक्षयच्या ‘या’ सिनेमांची एकाच दिवशी टक्कर!

दोन्ही सिनेमांपैकी कोणता सिनेमा सगळ्यात जास्त स्क्रिन्स मिळवणार आणि कोणता सिनेमा प्रक्षकांमध्ये गाजणार यावर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Akshay Kumar's Lakshmi Bamb and Salman's Radhe movie will be released on Eid

बॉलिवूडमधला खिलाडी अक्षय कुमार आणि दबंगस्टार म्हणून ख्यातनाम असलेला सलमान खान हे दोघेही ईदच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांसाठी धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहेत. अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बाँब’ तर सलमानचा ‘राधे’ या सिनेमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका मिळणार असल्याचे दिसत आहेत. अक्षय कुमारचा सिनेमाचे शुटींग पूर्ण झाले असून, सलमान खानच्या सिनेमाचे चित्रीकरण अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रीलीज होणार आहेत. त्यामुळे दोन्ही सिनेमांपैकी कोणता सिनेमा सगळ्यात जास्त स्क्रिन्स मिळवणार आणि कोणता सिनेमा प्रक्षकांमध्ये गाजणार यावर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नेटकऱ्यांनी केला मीम्सचा वर्षाव

 

अक्षय आणि सलमान यांचे दोन वेगवेगळे एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव केल्याचे दिसत आहे. यातच चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी देखील ट्विट करत म्हटले आहे की, ‘सलमान आणि अक्षय या दोघांचे सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत आहेत. त्यामुळे कोणत्या सिनेमाला सगळ्यात जास्त स्क्रीन मिळणार आणि कोण पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार असल्याचे’ ट्विट त्यांनी केले आहे.

 

सलमानच्या ‘राधे’ला स्क्रिन्स नाही?

चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी ट्विटरवरून सिनेमाच्या स्क्रिनसाठी दोघांत चढाओढ सुरू असल्याचे सांगितले आहे. याची माहिती देत त्यांनी म्हटले आहे की, ‘सध्या एसएस सिनेमाकडे दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील जवळ-जवळ ५० सिंगल स्क्रिन आहेत. त्यामुळे बागी ३ या सिनेमाला देखील स्क्रिन्स मिळत नाही आहेत. तर ईदच्या मुहूर्तावर एस एस सिनेमाने लक्ष्मी बाँब या सिनेमाला स्क्रिन द्याव्यात आणि राधे चित्रपटाला देऊ नयेत असे फॉक्स स्टार स्टुडिओने म्हटले’, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. यामुळे राधे आणि लक्ष्मी बाँब या सिनेमाच्या स्क्रिनवरून चांगलीच रस्सी खेच सुरू असल्याचे दिसत आहे.