Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Akshay Kumar Mother Death: अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन

Akshay Kumar Mother Death: अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं निधन

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची आई अरुणा भाटिया यांचे आज, बुधवारी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. अरुणा भाटिया यांची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग अर्धवट सोडून मुंबईलाही परत आला होता. मात्र दोनच दिवसात त्याच्या आईचे निधन झाले. अक्षय कुमारने भावूक होऊन स्वतः ट्वीट करत ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

- Advertisement -

ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने भावूक होऊन आपले दुःख शेअर केले आहे. एक दिवस आधी अक्षय कुमारने आपल्या आईच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन चाहत्यांकडे केले होते. यावेळी त्याने ट्विट करत असे म्हटले होते की,माझी आईच्या आरोग्यासाठी तुमची चिंता आणि प्रार्थना पाहून मी भारावून गेलोय. मी आणि माझ्या कुटुंबियांसाठी ही अत्यंत कठिण वेळ आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे खूप मदत होईल.

- Advertisement -

दरम्यान, अक्षय कुमार यांची आई अरुणा भाटिया यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी अरुणा यांची प्रकृती गंभीर होती. अक्षय कुमार त्यावेळी शुटिंगमध्ये व्यस्त होता. तो आपला आगामी चित्रपट ‘सिंड्रेला’च्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होता. ज्यावेळी अक्षयला आईच्या आजारपणाबाबत माहिती मिळाली, तो तेव्हाट लंडनहून मुंबईत दाखल झाला होता. अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज असून सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट ३० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल ५’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.


- Advertisement -