अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या दिवशी होणार रिलीज, ‘लाल सिंह चड्ढा’सोबत कांटे की टक्कर

या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत अभिनेत्री भूमी पेडणेवर सुद्धा दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय आणि भूमिची सुंदर केमिस्ट्री सुद्धा दिसत आहे

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. मागील काही दिवसांपूर्वी अक्षयने ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे ट्रेलर लवकरच रिलीज होईल असे सांगितले होते. त्यामुळे अक्षयचे चाहते सुद्धा ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान आता ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून या चित्रपटाची सुंदर झलक या ट्रेलर मधून पाहायला मिळत आहे.

2 मिनिट 55 सेकेंदाचा हा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कुमार आपल्या लहान 4 बहिणींवर जीवापाड प्रेम करत असतो. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत अभिनेत्री भूमी पेडणेवर सुद्धा दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय आणि भूमिची सुंदर केमिस्ट्री सुद्धा दिसत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट कौटुंबिक असून यामध्ये बहिण आणि भावाचे घट्ट नातं दाखवण्यात आलं आहे.

अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमि पेडणेकरची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धम्माल करणार आहे. या दोघांनी याआधी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळी या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.

अक्षय कुमार आणि आमिर खानमध्ये होणार टक्कर
अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे, शिवाय याचं दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ सुद्धा रिलीज होणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांपैकी प्रेक्षक नक्की कोणता चित्रपट पाहणं पसंत करतील याकडे सर्वांचेच लक्ष असेल.