घरमनोरंजन'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार अक्षय कुमारचा ‘राम सेतू’

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार अक्षय कुमारचा ‘राम सेतू’

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. दरम्यान, आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी प्रेक्षकांना शुल्क भरावे लागत होते. परंतु आता हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या फोन किंवा टि.व्हीवर मोफत पाहता येणार आहे.

प्राईम व्हिडीओवर मोफत पाहता येणार ‘राम सेतू’

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

23 डिसेंबर पासून अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ प्राईम व्हिडीओवर मोफत पाहता येणार आहे. काही दिवसांपासून या चित्रपटासाठी 199 रुपये मोजावे लागत होते. राम सेतु हिंदी भाषेव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगुमध्ये देखील उपलब्ध आहे. याबाबत एक पोस्ट शेअर करत अक्षयने स्वतः माहिती दिली आहे.

‘राम सेतू’ने बॉक्स ऑफिसवर कमावले होते इतके कोटी

- Advertisement -

Ram Setu' box office collection day 1: Akshay Kumar starrer scores Rs 15  crore on opening day | Hindi Movie News - Times of India
‘राम सेतू’ 25 ओक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. हा चित्रपट तयार करण्यासाठी 150 कोटी खर्च करण्यात आले होते. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 92 कोटी कमावले आहेत.

देशभरातील 3000 स्क्रीन्स वर झाला होता प्रदर्शित

Ram Setu: Jacqueline Fernandez charged Rs 4 crore, here's how many Crores Akshay  Kumar, Nushrratt Bharuccha and others charged for the film | GQ India
अभिषेक शर्मा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट देशभरातील 3000 स्क्रीन्स वर प्रदर्शित झाला होता. ‘राम सेतू’मध्ये अक्षय कुमार आणि जॅकलीन फर्नांडिस व्यतिरिक्त अभिनेत्री नुसरत भरुच देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये अक्षय कुमाराने एका आर्कियोलॉजिस्टची भूमिका साकारली आहे. जो आपल्या टीमसोबत राम सेतुच्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी 7 हजार वर्ष जुन्या इतिहासाचा पडदा हटवताना दिसून येतो.

 


हेही वाचा :

‘पठाण’ मधील दुसरं गाणं ‘झूमे जो पठाण’ प्रदर्शित; सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -