Akshay Kumar च्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाला मोठा धक्का; ‘या’ देशांमध्ये चित्रपटावर घालण्यात आली बंदी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लरचा बहुचर्चित चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ आता पुन्हा नव्या वाताच्या कचाट्यात सापडला आहे. याआधी या चित्रपटाच्या नावावरून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाचे नाव ‘पृथ्वीराज’ बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ करण्यात आले. मात्र आता चित्रपट रिलीज व्हायला सज्ज असताना पुन्हा एकदा चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी समस्या निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाला काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असून कुवैत आणि ओमान यांसारख्या देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

सूत्रांच्या मते, असं म्हणटलं जात आहे की “आपले गौरवशाली हिंदू सम्राट पृथ्वीराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर काही देशांमध्ये चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच बंदी घालण्यात येणं ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे”.

‘सम्राट पृथ्वीराज’ वादाच्या कचाट्यात
‘सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. याआधी या चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ असे नाव होते त्यावेळी राजस्थान मधील काही संघांकडून या चित्रपटाचे नाव बदलण्याचे आदेश देण्यात आले. मात्र जर या चित्रपटाचे नाव बदलले नाही तर हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर २७ मे रोजी या चित्रपटाचे नाव ‘सम्राट पृथ्वीराज’ असे करण्यात आले.

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय मानुषी छिल्लर सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ हिंदी भाषेसह तमिळ आणि तेलगू भाषेत सुद्धा प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :http://‘Zindagi Do Pal Ki’ पासून ते ‘Yaaro Dosti’ या सारख्या अनेक गाण्यांनी KK ने चाहत्यांना पाडली होती भुरळ