Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अक्षय कुमारचा कंगणाला सिक्रेट कॉल, थलायवीच्या ट्रेलरवर म्हणाला....

अक्षय कुमारचा कंगणाला सिक्रेट कॉल, थलायवीच्या ट्रेलरवर म्हणाला….

''खिलाडी अक्षय कुमार याने फोन आणि मेसेज करून माझ्या भूमिके बद्दल प्रसंशा केली असे लिहले आहे.

Related Story

- Advertisement -

दिवंगत अभिनेत्री तसेच तमिळनाडू च्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित “थालाईवी” चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रसारित करण्यात आला. यात जयललिता यांची भूमिका सकारनारी मुख्य अभिनेत्री कंगणा रनौत च्या अभिनयाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. अशातच कंगणा ने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर नुकतेच ट्वीट केले आहे ज्यात तिने ”खिलाडी अक्षय कुमार याने फोन आणि मेसेज करून माझ्या भूमिके बद्दल प्रसंशा केली असे लिहले आहे . कंगणा पुढे लिहते की अक्षय माझ्या चित्रपटाची प्रशंसा दीपिका पादुकोण तसेच आलिया भट्ट यांच्या चित्रपटासारखी सगळ्यांसमोर नाही करू शकत कारण की तो मुव्ही माफियांना घाबरतो.”आता कंगणा ने केलेल्या ट्विट मध्ये किती तथ्य आहे हे अक्षय कुमार स्वत: याबाबत खुलासा करू शकतो.

- Advertisement -

पंगा क्वीन कंगणा रनौत आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगणाच्या पाली हिल मधील घर आणि ऑफिस अनाधिकृत बांधकामा अंतर्गत तोडण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी कंगणाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘पंगा’ तसेच ”मणिकर्णिका’ या चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले आहे.


हे हि वाचा – आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चे नरेंद्र मोदींकडून कौतुक

- Advertisement -