अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट फ्लॉप तर शाहरुखच्या ‘पठाण’चा जलवा कायम

या संपूर्ण महिन्यात बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपटांची चांगलीच चुरस पाहायला मिळाली. 25 जानेवारीला शाहरुख आणि दीपिकाचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली. तर दुसरीकडे कार्तिक आर्यन आणि कृती सेननचा ‘शहजादा’ चित्रपट 17 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आणि 24 फेब्रुवारीला अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा सेल्फी चित्रपट प्रदर्शित झाला मात्र, ‘पठाण’ समोर हे दोनही चित्रपट फारशी कमाई करु शकले नाही.

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट फ्लॉप

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारच्या चित्रपटांसाठी 2022 फारसं चांगलं गेलं नाही. अशातच आता 2023 ची सुरुवात देखील अक्षयलाठी वाईट ठरली आहे. 24 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा सेल्फी चित्रपटाने आत्तापर्यंत केवळ 10.24 कोटीच कमावले आहेत. तसेच कार्तिक आर्यन आणि कृती सेननच्या ‘शहजादा’ चित्रपटाने आत्तापर्यंत 29.44 कोटी कमावले आहेत.

‘पठाण’चा जलवा कायम

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

दरम्यान, शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला पण तरीही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 525 कोटींची कमाई केली आहे.


हेही वाचा :

मॉडेल निकिता घाग ‘या’ कारणाने परत करणार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार