काश्मीरमध्ये सापडला बॉलिवूडचा खिलाडी

अक्षय कुमार सारख्या दिसणाऱ्या व्यक्तील भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू सुनील गावस्कर आवडत असल्याचे त्याने सांगितले.

असं म्हटलं जात की, या जगात एकसारखे दिसणारे सात चेहऱ्याची माणसं असतात. असं काहीस घडलं आहे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्याबाबतीत. खिलाडी अक्षय कुमार याच्यासारखा दिसणारा माणूस काश्मीरमध्ये सापडला आहे. अक्षय सारख्या सेम-टू-सेम दिसणाऱ्या या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अक्षय कुमारच्या चाहत्यांना हा फोटो पाहून धक्का बसला आहे. या दोघांचा फोटोची तुलना करत अक्षय कुमारच्या चाहत्यांनी टि्वट केलं आहे.

हा फोटो एका वृत्तवाहिनीचे सहाय्यक संपादकांनी त्याच्या टि्वटवर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच अक्षय सारख्या दिसणाऱ्या हा व्यक्ती काश्मीरमधील श्रीनगरचा रहिवासी आहे. त्याचे नाव माजिद मीर असं आहे. अक्षय सारख्या दिसणाऱ्या हा व्यक्ती असं म्हणाला आहे की, त्याला भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर खूप आवडतो. म्हणून तो दररोज त्याच्या सारखी टोपी घालून वावरत असतो.

अक्षय आणि माजिद या दोघांमध्ये फक्त उंची आणि वयात फरक आहे. अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ या चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरना दिसत आहे. सध्या अक्षय ‘सूर्यवंशी’ या चित्रपटच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत कतरिना कैफ दिसणार आहे.


हेही वाचाट्रम्प यांच्या पत्नीचा ‘हा’ किसींग फोटो व्हायरल; पण किस केलं कुणाला!