अक्षय कुमारची मुलीसोबत पतंगबाजी, Video व्हायरल

'छोटी मदतगार' (लिटील हेल्पर) असं कॅप्शन देत अक्षयने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, याद्वारे त्याने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Add New Post ‹ Aapla Mahanagar — WordPress
सौजन्य- DNA india
आज देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. संक्रांतीचा हा सण विविध प्रांतात वेगवेगळ्या नावाने प्रचलिच आहे. पोंगल, लोहरी, बिहू अशा अनेक नवांनी ओळखला जाणारा हा सण प्रत्येक प्रांतामध्ये साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक राज्याप्रमाणे संक्रांतीची ओळख वेगळेगळी असली तरी आजच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा मात्र बहुतांशी राज्यांमध्ये आहे. ‘पतंगबाजी’ ही मकर संक्रांतीची खरी ओळख आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान, संक्रांतीच्या निमित्ताने बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याने आपल्या मुलीसोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. अक्षय

इतर सर्वच सण आणि उत्सवांप्रमाणेच बॉलीवूड स्टार्स दरवर्षी संक्रांतीचा सणही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. याच धर्तीवर अक्षय कुमारचा हा पतंगबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे. अभिनयासोबतच खेळांमध्ये रस ठेवणारा अक्षय कुमार पतंगबाजीमध्येही बहुधा तरबेज असावा. दरम्यान, बॉलीवूडच्या अनेक नव्या-जुन्या कलाकारांनी इन्स्टाग्राम, ट्वीटरसारख्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरु आपल्या चाहत्यांनी संक्रांत आणि लोहरीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. अमिताभ बच्चन, काजल अगरवाल, रिषी कपूर, हेमा मालिनी अशा अनेक सुपरस्टार्सनी संक्रांतीच्या निमित्ताने चाहत्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धीची भरभराट होवो, अशी इच्छा व्यक्त केली आहे.