घरताज्या घडामोडी'पाठक बाई' दिसणार आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

‘पाठक बाई’ दिसणार आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

Subscribe

झी मराठीवर येणाऱ्या अपकमिंग 'हे तर काहीच नाही' या कॉमेडी शोमध्ये अक्षया दिसणार आहे.

छोट्या पडद्यावर तुझ्यात जिव रंगाला म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या ‘पाठक बाई’ म्हणजेच अभिनेत्री ‘अक्षया देवधर’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. झी मराठीवर येणाऱ्या अपकमिंग ‘हे तर काहीच नाही’ या कॉमेडी शोमध्ये अक्षया दिसणार आहे. आता अक्षया आणि कॉमेडी यांचा काय संबंध असा प्रश्न पडला असेल तर अक्षया या शो मध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.  सूत्रसंचालकाच्या वेगळ्या भूमिकेत अक्षया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अक्षयासोबत या शो मध्ये सिद्धार्थ जाधव आणि सैराट फेम तानाजी गलगुंड देखील दिसणार आहेत. अनेक सरप्राइझेस  प्रेक्षकांना या शो च्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत.

 

- Advertisement -

महाराष्ट्राला विनोदी पात्र साकारण्याची परंपरा खूप मोठी आहे अगदी संत एकनाथ महाराजांच्या भारूडापासून ते बुरगुंडा पर्यंत किंवा प्र. के अत्रे, पु ल. देशपांडे ते वऱ्हाडकार डॉ. लक्ष्मण देशपांडे पर्यंत. पण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अशा एकपात्री व्यक्तिरेखा साकारत असतात जसे की चौकात, नाक्यावर, कट्यावर, चहाच्या टपरीवर, मित्रांसोबत, समारंभात आणि ह्या गोष्टी अगदी मसाला लावून रंगवून सांगितल्या जातात.

- Advertisement -

अशाच काही सेलेब्रिटींच्या आयुष्यातील गोष्टी ज्या सामान्य लोकांना माहिती नाहीत अश्या गोष्टींच्या किस्स्यांचा फड झी मराठी वर रंगणार आहे. अगदी शाहरुखपासून शरद केळकर पर्यंत, सुनील गावस्करपासून सुनील बर्वे पर्यंत.. त्यांच्या व्हॅनिटीतील, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यापासून ते लग्नापर्यंत सर्व गोष्टी या मंचावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत.


हेही वाचा – रोहित सोनालीची वायरलवाली Love Story

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -