HomeमनोरंजनAkshaya Deodhar : पाठकबाईंचं कमबॅक ; या नव्या मालिकेत झळकणार अक्षया देवधर

Akshaya Deodhar : पाठकबाईंचं कमबॅक ; या नव्या मालिकेत झळकणार अक्षया देवधर

Subscribe

राणादाच्या पाठकबाईंचं आता पुन्हा झी मराठीवर कमबॅक होणार आहे. प्रेक्षकांमध्ये पाठकबाई म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री अक्षया देवधर लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीच्या नव्याकोऱ्या मालिकेतून अर्थात ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून अक्षया पुनरागमन करणार आहे. लक्ष्मी निवास या मालिकेत अक्षया भावनाची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता तुषार दळवी झी मराठीवर पुनरागमन करत आहेत.

अक्षयाने तिच्या नव्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मालिकेतील भावना ही अत्यंत भावनिक मुलगी आहे. आई-वडीलांना समजून घेणारी, थोडी अबोल आणि स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी असलेली आहे. भावनाच्या पत्रिकेत दोष असल्याने तिचं लग्न जुळण्याच अडचण येत आहे. आपण आपल्या घरच्यांवर ओझं आहोत अशी भावना तिच्या मनात आहे, असे अक्षयाने तिच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

- Advertisement -

” मला प्रॉड्यूसरचा फोन आला आणि झी मराठीसाठी ऑडिशन असल्याचे सांगितले. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मला चार ते पाच वर्षानंतर पुन्हा झी मराठीवर काम करायलं मिळण, त्यातून एक नवी भूमिका, कौटुंबिक कथा ऐकून खूप छान वाटलं. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी आणि अनेक कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मी हर्षदाताईला खूप वर्षापासून ओळखते. पण, तिच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली नाही. या मालिकेत हर्षदाताई माझ्या आईच्या भूमिकेत आहे. ती इंडस्ट्रीची मम्मा आहेच, पण आता ती माझीही आई होणार आहे तर छानं वाटतयं, “असे अक्षया म्हणाली आहे.

भावनाच्या लूकबद्दल अक्षया सांगते की, ‘भावना ३० वर्षाची आहे. ती साधी, सरळ, सोज्वळ आहे. मी कधीचं स्वत:ला वेणीमध्ये पाहिले नाही. पण, भावनाची वेणी, तिच्या साड्या, तिचे ड्रेस सगळचं प्रेक्षकांना आवडेल. ‘

- Advertisement -

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -