घरमनोरंजन'हेरी फेरी 3'ला अक्षयचा नकार, सुनील शेट्टीने व्यक्त केली खंत

‘हेरी फेरी 3’ला अक्षयचा नकार, सुनील शेट्टीने व्यक्त केली खंत

Subscribe

बॉलिवूडमधील सर्वाधिक सुपरहिट ठरलेल्या ‘हेरा फेरी’ आणि ‘हेरी फेरी 2’ या चित्रपटांच्या दोन्ही पार्टला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. दरम्यान, सध्या मागील काही दिवसांपासून ‘हेरी फेरी 3’ चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने नकार दिला असून त्याच्या जागी कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, याचं संदर्भात अभिनेता सुनील शेट्टीला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, अक्षय कुमार नसल्यास तुम्ही या चित्रपटामध्ये श्यामची भूमिका साकारणार का? यावर सुनील शेट्टीने सांगितलं की, “श्याम एक आयकॉनिक पात्र आहे. मग अशावेळी मी चित्रपट का करु नये? फक्त सर्वांनी एकत्र असायला हवे. याबाबत अजून विचार केला जाईल”.

- Advertisement -

तसेच सुनील शेट्टी पुढे म्हणाला की, “मी पुन्हा काम करायला सुरुवात केली आहे आणि मला खूप काम करायचे आहे. अशात मी श्यामची भूमिका माझ्या हातातून जाऊन देऊ शकत नाही. फक्त हे आधीसारखंच असावं. त्यानंतर सुनील शेट्टी पुढे म्हणाला की, मी सर्वांना शुभेच्छा देतो. जर सोबत असू तर चांगलं आहे. राजू, श्याम आणि बाबू भाई जिंवत असणं खूप गरजेच आहे. राजू आणि श्याम शिवाय चित्रपट बनू शकतो पण बाबू भाईशिवाय नाही बनू शकत. ते या चित्रपटाचा जीव आहेत”.

‘हेरी फेरी 3’ चित्रपटाबाबत काय म्हणाला होता अक्षय
मागील काही दिवसांपूर्वी ‘हेरी फेरी 3’ चित्रपटाबाबत अक्षय म्हणाला होता की, “‘हेरी फेरी’ माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. मला देखील दुःख होतं की इतके वर्ष चित्रपट तयार झाला नाही. परंतु मला वाटतं आता काहीतरी वेगळा विचार करायला हवा. चित्रपटाचं जे स्क्रिप्ट होतं ते मला आवडलं नव्हतं. त्यामुळे मी नकार दिला. मला खूप विचार करावा लागेल. सोशल मीडियावर नो राजू नो हेरा फेरी असं लोक बोलत आहेत. त्यामुळे मला खूप वाईट वाटतयं. त्यांनी राजूला खूप प्रेम दिलं. परंतु आता मी त्यांची माफी मागतो. मी हेरा फेरी नाही करत. प्लीज मला माफ करा”.

- Advertisement -

 


हेही वाचा :

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून होणार सुरुवात

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -