आलिया आणि रणबीर लवकरच होणार आई-बाबा; सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

आलिया भट्टने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. लग्न झाल्यापासून दोघेही बऱ्याच प्रमाणात चर्चेत असतात. आता अशातच पुन्हा मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण येत आहे. त्याचं कारण म्हणजे नुकताच आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती आई होणार असल्याची बातमी सांगितली आहे. आलियाची ही पोस्ट पाहताच अनेक दिग्गज कलाकारांसह आलियाच्या चाहत्यांनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आलिया भट्टने शेअर केली पोस्ट
आलिया भट्टने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत. दोघेही डिस्पले कडे पाहत आहेत. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या जन्माला येणाऱ्या मुलाची झलक दिसत आहे. डिस्पलेकडे पाहून आलिया खूप खूश असल्याचं दिसत आहे.

हा शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की…..

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 या फोटोसोबत आलियाने अजून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एक सिंहाचे जोडपे दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचं लहान पिल्लू सुद्धा दिसत आहे. तसेच या फोटोसोबत आलियाने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आमचे मुल लवकरच येत आहे.” आलियाची ही पोस्ट पाहताच अनेक दिग्गज कलाकारांसह आलियाच्या चाहत्यांनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

एप्रिलमध्ये झालं होतं आलिया आणि रणबीरचं लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने दोन महिन्यांपूर्वी लग्न केले होते. दरम्यान आता आलियाने आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच चाहते खूप आनंदी झाले आहेत.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार एकत्र
आलिया आणि रणबीर कपूर लवकरच त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.