आलियाने सेल्फी काढण्यासाठी मागितला सॅमसंगचा फोन; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता आणखी अशाच एका कारणामुळे आलिया चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर आलियाचा एक मजेशीर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात आलिया एका कार्यक्रमात सगळ्यांकडे फोन मागताना दिसत आहे. खरं तर, आलिया एक अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने सुरुवातील तिने कॅमेरासमोर पोझ दिल्या. मात्र, त्यानंतर ती सर्वांकडे फोन मागू लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकत्याच पार पडलेल्या ‘झी सिने अवॉर्ड’ सोहळ्याला आलियाने हजेरी लावली होती. यावेळी आलियाने सुंदर हाय-स्लीट ड्रेस परिधान केला होती. यादरम्यानचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुरुवातीला एक फोटोग्राफर आलियाकडे सेल्फी मागतो. त्यावर आलिया त्यांना, ‘सॅमसंगचा फोन कोणाकडे आहे?’ असा प्रश्न विचारते. हे ऐकून सर्वजण हसू लागतात. अशातच कोणीतरी मनोजकडे आहे असं म्हणतं. आलिया त्याला देखील मोठ्याने हाक मारते. थोड्यावेळाने तिला हवा असलेला फोन तिला मिळतो. दरम्यान, आलियाच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.

या चित्रपटात दिसणार आलिया

आगामी काळात आलिया अभिनेता रणवीर सिंहसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. तसेच आलिया, प्रियंका आणि कतरिनासोबत ‘हार्ट ऑफ स्टोन’या चित्रपटात देखील दिसणार आहे.

 


हेही वाचा :

‘गदर 2’ मध्ये सनी देओलच्या सूनेची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री