घरमनोरंजनलवकरच निर्मिती क्षेत्रात आलियाचे पदार्पण !

लवकरच निर्मिती क्षेत्रात आलियाचे पदार्पण !

Subscribe

अभिनय क्षेत्रात एन्ट्री केल्यानंतर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीच, परंतु आता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला असून स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरु करणार आहे.

आपल्या शानदार अभिनयाच्या शैलीने अनेक चाहत्याच्या मनावर भुरळ पाडली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उत्कृष्ट सौंदर्य आणि दर्जेदार अभिनयामुळे आलिया भटने स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. हिच आलिया अभिनयानंतर आता निर्मिती क्षेत्रातकडे वळली आहे. याकरिता ती स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरु करणार आहे. असे आलियाने खुद्द एका मुलाखतीत सांगितले. अभिनय क्षेत्रात एन्ट्री केल्यानंतर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीच, परंतु आता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला असून स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरु करणार आहे. या प्रोडक्शन हाऊसचे नाव Eternal Sunshine Productions असे असणार आहे. सध्या या प्रोडक्शन हाऊसचे काम सुरु आहे.

चित्रपटांची निर्मिती करावी हे स्वप्न

चित्रपटांची निर्मिती करावी अशी बालपणापासूनच स्वप्न होते, आणि हेच स्वप्न Eternal Sunshine Productions च्या माध्यमातून साकारणार आहे. या स्वत:च्या प्रोडक्शन हाऊस मार्फत जे चित्रपट स्वतःला बघायला आवडतील अशाच चित्रपटांची करण्याकडे अधिक कल असेल, असे एका मुलाखतीत आलियाने सांगितले.

- Advertisement -

यासोबतच, एक दमदार प्रॉडक्शन प्लॅन आखला आहे. संपूर्ण टीम सध्या यावर काम करत आहे. या प्रॉडक्शन हाऊसची प्रत्येक लहान-सहान गोष्ट, अगदी फर्निचरपासून सगळ्या गोष्टी स्वत: जातीने लक्ष देऊन तयार केल्या आहे. हे माझे घर आहे आणि ते कधीच बदलणार नाही, असेही आलियाने सांगितले.

मुख्य भूमिकेमुळे बॉक्स ऑफिस गाजवले

बॉलिवूडमध्ये आलियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून एन्ट्री केली होती. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मुळे नावारूपास आलेली आलिया भट सध्या आघाडीची अभिनेत्री आहे. तर, ‘राझी’, ‘गली बॉय’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्याने बॉक्स ऑफिस गाजताना दिसत आहे. आलियाचा ‘गली बॉय’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आलिया व रणवीर सिंग या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. लवकरच आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -