आलिया भट्ट आणि शाहरूख खानचा ‘Darlings’ ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टला बॉलिवूड मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप अभिनेत्रींपैकी ओळखले जाते. मागील अनेक दिवसांपासून एका मागोमाग एक असे अनेक हिट चित्रपट देत आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली. या चित्रपटाला दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी दिग्दर्शित केले होते. ‘गंगूबाई काठियावाडी’च्या यशानंतर अनेक दिग्दर्शक आलियाला आपल्या चित्रपटांमध्ये कास्ट करण्यासाठी उत्सुक आहेत. आता असाच एक नवा कोरा चित्रपट आलिया घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘डार्लिंग्स’ असे असून हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नसून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आलियाचा ‘डार्लिंग्स’

आलियाने  सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे. त्यात तिने सांगितले की, ‘डार्लिंग्स’ चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मात्र अजून या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली नाही. या चित्रपटाच्या माध्यामातून आलिया भट्ट निर्मीती म्हणून पदार्पण करत आहे. इतकचं नव्हे तर आलियाचा हा चित्रपट शाहरूख खानचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीजच्या बॅनर खाली तयार करण्यात आली आहे. लग्नानंतर आलियाचा हा पहिला चित्रपट आहे, जो ओटीटी वर रिलीज होणार आहे.

‘या’ चित्रपटांमध्ये दिसणार आलिया
येत्या काळात आलिया भट्ट पती रणबीर कपूर सोबत ‘ब्रम्हास्त्र’ मध्ये दिसून येणार आहे. याशिवाय आलिया आता करण जोहरच्या ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते.या चित्रपटात आलिया रणवीर सिंह सोबत दिसणार आहे.

 


हेही वाचा :‘Samrat Prithviraj’पासून ‘Jug Jugg Jeeyo’पर्यंत जून महिन्यात रिलीज होणार ‘हे’ 7 चित्रपट