आलिया भट्ट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, सलमान, शाहरूखलाही टाकले मागे

alia bhatt became the most expensive actress shah rukh khan and salman khan
आलिया भट्ट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, सलमान, शाहरूख, दीपिकालाही टाकले मागे

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठीयावाडी’ आणि आरआरआर या चित्रपटांमुळे खूप लोकप्रिय होत आहे. या चित्रपटांच्या यशानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक नवीन आनंदाची बातमी समोर आली आहे. 2021 सालचा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन नुकताच समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये आलिया भट्ट सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय सेलिब्रिटी अभिनेत्री ठरली आहे. डफ अँड फेल्प्सने व्हॅल्यू सेलिब्रिटींची यादी जाहीर केलीय. या यादीत टॉप 10 मध्ये अभिनेता रणवीर सिंग, आलिया भट्ट, अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण या कलाकारांचाही समावेश आहे.

या रिपोर्टमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट ही 2021 मधील सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. तिची कमाई जवळपास 68.1 मिलिनय असल्याचे म्हटले जातेय. या रिपोर्टमध्ये आलिया चौथ्या क्रमांकासह भारतीय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तसेच सर्वाधिक मानधन घेण्यासह आलिया बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्री आहे. दरम्यान 2020 सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्टमध्ये आलिया सहाव्या क्रमांकावर होती.

दरम्यान यंदाच्या टॉपच्या या यादीत किंग खान शाहरुखचे नाव कुठे दिसले नाही. मात्र सलमान खान 51.6 मिलिनय डॉलरसह आठव्या क्रमांकावर आहे. तर अभिताभ बच्चन यांच्या ब्रँड व्हॅल्युएशनमध्ये सुधारणा होत यंदा ते 54.2 मिलियन डॉलरसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

अभिनेत्री अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील आलिया भट्टच्या छोट्या पण महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचेही कौतुक होत आहे. इतकेच नाही तर आलिया भट्टचे ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारखे बिग बजेट चित्रपट 2022 मध्ये रिलीज होणार आहेत, ज्याची सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आलिया भट्ट नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सोशल मीडियावर गाजत आहेत.


सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘The Kapil Sharma Show’? कपिलसोबत वादाची चर्चा