घरमनोरंजनआलिया भट्टचा कारच्या छतावर चढून हंगामा, चाहत्यांची उडाली झुंबड

आलिया भट्टचा कारच्या छतावर चढून हंगामा, चाहत्यांची उडाली झुंबड

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आज टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टने चाहत्यांच्याही मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे आलियाचा चाहता वर्गही मोठा आहे. आलिया सौंदर्यासोबतच तिच्या हटके स्टाईलने चाहत्यांना वेड लावत असते. तर तिच्या अभिनयाला देखील चाहत्यांकडून तितकीच दाद मिळते. आलियाच्या क्यूटनेसवरही चाहते फिदा आहेत. सध्या सोशल मीडियावर आलियाचे काही फोटो व्हायरल होत आहे. यातही तिची क्यूट स्टाइल पाहायला मिळतेय. या फोटोंमधील क्यूटनेसने  चाहत्यांना अक्षरश: वेड लागले आहे. आलिया भट्ट या फोटोंमध्ये कारच्या छतावर चढून हंगामा करतेय, तर तिचा हा हंगामा पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी झुंबड केल्याचे पाहायला मिळतेय.

आलियाचा मस्तीवाला अंदाज

या फोटोंमध्ये आलिया भट्ट कारच्या छतावर चढून खूप गोंधळ घालताना दिसत आहे. बाजारातील रस्त्याच्या मधोमध ही कार उभी आहे. यावेळी कारच्या छतावर उभी राहत आलिया हातात भोंगा घेत काहीतरी बोलतेय तर काही फोटोंमध्ये ती नाचतानाही दिसली आहे. आलियाचे हे फोटोज आता तुफान व्हायरल होत आहेत. आलियाची ही चुलबुली स्टाइल चाहत्यांनाही फार आवडली आहे. तिच्या या हटके रावडी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. अभिनेत्रीची अशी स्टाईल चाहत्यांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

- Advertisement -

आलियाचा चुलबुला अंदाज

आलिया भट्ट भर रस्त्यावर उभ्या कारवर चढून खरोखरं  असा हंगामा करतेय का? असा प्रश्न पडला असेल.परंतु असे नसून तिने एका शुटिंगदरम्यान केलेला हा फन आहे. मात्र आलियाचा हा चुलबुला अंदाज अनेकांना आवडला आहे. यावेळी आलियाने एकदम ट्रेंडी कपडे कॅरी केले होते. तर यात ती खूप मस्तीच्या मूडमध्येही दिसली. तिने ब्लू डेनिमसोबत लाल रंगाचे जॅकेट कॅरी केले होते. आलियाने हे शूट मुंबईच्या रस्त्यावरील आहे. त्यामुळे फोटोग्राफरनेही तिचा हा हटके अंदाज कॅमेरात कैद करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळतेय.

- Advertisement -

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्या, आलिया संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमात झळकणार आहे.  ‘गंगूबाई काठियावाडी’ व्यतिरिक्त आलिया एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्येही दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये ती पहिल्यांदाच तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -