‘रज्जो’ मालिकेत मुख्य भूमिका मिळवण्यामागे आलिया भट्ट कनेक्शन!

'रज्जो' हा एक नवीन शो आहे जो उत्तराखंडच्या पुरातून वाचलेल्या मुलीच्या प्रवासाची कहाणी सांगतो. तिची आई गमावणे आणि अॅथलीट बनण्याचे तिचे अपूर्ण स्वप्न कसे साकार होईल यावर हा शो प्रकाश टाकतो. शिवाय, आईचा विरोध असताना देखील ती तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शहरात येते.

स्टारप्लसचा आगामी टीव्ही शो ‘रज्जो’ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे कारण आलिया भट्ट सारखी हुबेहूब दिसणारी कलाकार सेलेस्टी बैरागी यातून मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. आसाममधील सेलेस्टी बैरागीने काही दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी मधील दृश्य रीक्रिएट करून ‘हुबेहूब आलिया’ बनून सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले होते. स्टारप्लसच्या आगामी ‘रज्जो’मध्ये मुख्य नायिका बनून सेलेस्टीने अभिनेत्री होण्याचे तिचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे.

‘रज्जो’ हा एक नवीन शो आहे जो उत्तराखंडच्या पुरातून वाचलेल्या मुलीच्या प्रवासाची कहाणी सांगतो. तिची आई गमावणे आणि अॅथलीट बनण्याचे तिचे अपूर्ण स्वप्न कसे साकार होईल यावर हा शो प्रकाश टाकतो. शिवाय, आईचा विरोध असताना देखील ती तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शहरात येते.

आलिया भट्टची मोठी फॅन, सेलेस्टी ही आसाममधील सोशल मीडिया मॉडेल आहे जी इंग्रजी साहित्यात पदवी घेत आहे. आपल्या या भूमिकेबद्दल सेलेस्टी म्हणाली, “मी आलिया भट्टची खूप मोठी फॅन आहे आणि तिचे चित्रपट पाहणे मला आवडते. एक युवा म्हणून मी सोशल मीडिया, नवीन रील आणि कथांमधून स्वतःला अपडेट करत राहते. आणि काही महिन्यांपूर्वी, मी गंगूबाई काठियावाडीचा एक सीन रिक्रिएट केला आणि पोस्ट केला. निर्मात्यांनी ते पाहिले आणि मला ऑडिशनसाठी बोलावले आणि काही मॉक शूटनंतर मला ‘रज्जो’ची भूमिका मिळाली.” ‘रज्जो’ 22 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय प्रमाणित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता स्टार प्लसवर लॉन्च होणार आहे.


हेही वाचा :‘बाईपण भारी देवा!’ केदार शिंदेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला