घरताज्या घडामोडी'या' चित्रपटामुळे आलियाच्या Gangubai Kathiawadi चित्रपटच्या प्रदर्शनाचा मुहूर्त टळला

‘या’ चित्रपटामुळे आलियाच्या Gangubai Kathiawadi चित्रपटच्या प्रदर्शनाचा मुहूर्त टळला

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Aalia Bhatt) आगामी चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ची (Gangubai Kathiawadi) जेव्हा घोषणा झाली तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या प्रतिक्षेत होते. जेव्हा चित्रपटगृह खुली करण्याची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा निर्मात्यांनी ६ जानेवारी २०२२ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ आता ६ जानेवारीला प्रदर्शित होणार नाही. चाहत्यांना आलियाच्या या बहुचर्चित चित्रपटाची अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. संजय लीला भंसाळी निर्मितीच्या बॅनरखाली तयार झालेला ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख १८ फेब्रुवारी २०२२ केली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची अधिकृत माहिती दिली आहे.

जेव्हा ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ६ जानेवारी असल्याची घोषित केली होती. त्यादरम्यान ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली होती. ट्रिपल आर ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मोठ्या बजेटचे दोन चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख टळणार होती, हे निश्चित झाले होते. कारण एसएस राजामौलीची ट्रिपल आर एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर (Jr.NTR), राम चरण (Ram Charan), अजय देवगन (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट दिसणार आहे.

- Advertisement -

दरम्यान ट्रिपल आर टीझरची तुलना बाहुबलीसोबत केली जात आहे. ट्रिपल आर चित्रपट एसएस राजामौली यांनी खूप भव्य पद्धतीने तयार केला आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘गंगुबाई काठियावाडी’ पण संजय लीला भंसाळी यांचा ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. यामध्ये आलिया भट्ट एका वेगळा रुपात दिसणार आहे. या चित्रपटासाठी आलियाने खूप मेहनत घेतली आहे.


हेही वाचा – Prithiviraj chauhan Teaser: “हिंदूस्तान का शेर आ रहा है”, अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा टीजर रिलीज

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -